नवी दिल्ली : सिद्धू मुसेवाला हत्या प्रकरणातील आरोपी अंकित सिरसा याच्यासह लॉरेन्स बिश्नोई गँगच्या दोघांना दिल्ली पोलिसांच्या विशेष सेलने अटक केली. सचिन भिवानी आणि प्रियाव्रत फॉजी असे अटक केलेल्या दोघांची नावे आहेत.
सिद्धू मुसेवालावर गोळी झाडणा-यांपैकी अंकित सिरसा हा एक होता. तसेच राजस्थानमधील हत्येच्या दोन गुन्ह्यातही पोलिस त्याचा शोध घेत होते. त्यामुळे त्याची अटक महत्त्वाची आहे.