22.5 C
Latur
Friday, July 30, 2021
Homeराष्ट्रीयबारावीचा निकाल ३१ जुलैपर्यंत जाहीर करा; सर्वोच्च न्यायालयाचे आदेश

बारावीचा निकाल ३१ जुलैपर्यंत जाहीर करा; सर्वोच्च न्यायालयाचे आदेश

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : राज्य बोर्डांनी बारावीच्या अंतर्गत मूल्यांकन पद्धतीची योजना लवकरात लवकर तयार करण्याची आवश्यकता आहे. तसेच १२ वीचा निकाल ३१ जूलैपर्यंत जाहीर करावेत, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने गुरुवार दि़ २४ जून रोजी दिले आहेत़

अंतर्गत मूल्यांकन पद्धत १० दिवसांमध्ये निश्चित करायला हवी, असेही न्यायालयाने स्पष्ट केले आहे. कोर्टाने या महिन्याच्या सुरुवातीला सीबीएसई आणि सीआयएसएसई बोर्डाला अंतर्गत मूल्यांकन पद्धत ठरवण्यासाठी दोन आठवड्यांचा कालावधी दिला होता. सर्वोच्च न्यायालयाने सीबीएसई आणि सीआयएसएसई बोर्डाला अंतर्गत मूल्यांकन निकष ठरवण्यास सांगितले होते. आता अशाच प्रकारचे निर्देश कोर्टाने राज्य बोर्डांना दिले आहेत. सीबीएसई आणि सीआयएसएसई बोर्डाने याआधीच अंतर्गत मूल्यांकन निकष कोर्टासमोर सादर केले आहेत. सर्वोच्च न्यायालयाने या मूल्यांकन निकषाला हिरवा झेंडा दाखवला आहे. तसेच मूल्यांकन निकष योग्य आणि वाजवी असल्याची टीप्पणी जोडली आहे.

पालकांच्या सर्व याचिका फेटाळल्या
देशात कोरोना महामारीचा प्रादुर्भाव असल्याने अनेक परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बारावीच्या परीक्षा रद्द केल्याची घोषणा केली होती. काही पालक आणि विद्यार्थ्यांनी चिंता व्यक्त करण्यात आल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला होता. असे असले तरी काही पालकांनाकडून परीक्षा घेण्यासाठी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती. पण, कोर्टाने त्या फेटाळून लावल्या आहेत.

२१ राज्यांनी १२ वी बोर्डाच्या परीक्षा रद्द केल्या
लाखो विद्यार्थी आणि पालकांनी कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी यांना पत्र लिहून परीक्षा रद्द करण्याची विनंती केली होती. दहावीच्या परीक्षा याआधीच रद्द करण्यात आल्या आहेत. आतापर्यंत २१ राज्यांनी १२ वी बोर्डाच्या परीक्षा रद्द केल्या आहेत. विद्यार्थ्यांचे आरोग्य आणि सुरक्षा याला सर्वाधिक महत्त्व आहे आणि त्याबाबत कसलीही तडजोड चालणार नाही, असे पंतप्रधान मोदी म्हणाले होते.

कोरोनामुळे दोन कुख्यात नक्षलवाद्यांचा मृत्यू

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
200FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या