30.2 C
Latur
Wednesday, March 3, 2021
Home राष्ट्रीय दिल्लीत पाकिस्तान जिंदाबादची घोषणा

दिल्लीत पाकिस्तान जिंदाबादची घोषणा

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : प्रजासत्ताक दिनाच्या दोन दिवसाआधी राष्ट्रीय राजधानी दिल्लीमध्ये पाकिस्तान जिंदाबादची घोषणा दिली गेल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. दिल्ली पोलिसांनी सांगितल्यानुसार, रविवारी सकाळी-सकाळी खान मार्केट मेट्रो स्टेशनजवळ ई-बाईक रेस दरम्यान पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देण्यात आल्या आहेत.

पोलिसांच्या माहितीनुसार, तुघलक रोड पोलिस स्टेशनला एक पीसीआर कॉल आला, ज्यात खान मार्केट मेट्रो स्टेशनजवळ पाकिस्तान जिंदाबादची घोषणा देण्यात आल्याची तक्रार करण्यात आली. पोलिस घटनास्थळी पोहोचल्यानंतर त्यांना तेथे २ पुरुष, ३ महिला आणि एक अल्पवयीन आढळले.

दिल्ली पोलिसांनी म्हटले की, दोन कुटुंब आपल्या मुलांसोबत इंडिया गेट पाहण्यासाठी आले होते. त्यांनी ई-बाईक किरायाने घेतली होती. त्यांनी ई-बाईक शर्यत लावताना एकमेकांची नावे पाकिस्तानसह अनेक देशांच्या नावावर ठेवली. यावेळी त्यांनी आनंदात पाकिस्तान जिंदाबादचे नारेही दिले. याप्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत.

तुरुंगात जाण्याची संधी..!

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,438FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या