34.3 C
Latur
Monday, April 19, 2021
Homeराष्ट्रीयआणखी ४ आठवडे चिंतेचे; केंद्र सरकारचा गंभीर इशारा

आणखी ४ आठवडे चिंतेचे; केंद्र सरकारचा गंभीर इशारा

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येवरून आता केंद्र सरकारने गंभीर इशारा दिला आहे. पुढचे ४ आठवडे हे अतिशय चिंतेचे आहेत. अशा परिस्थितीत थोडाही निष्काळजीपणा दाखवला तर तो भोवेल. कोरोनाची दुसरी लाट नियंत्रित करण्यासाठी जनतेचा सहभाग महत्त्वाचा आहे, असे केंद्र सरकारने म्हटले आहे. देशात कोरोनाचे वाढते रुग्ण आणि लसीकरणाच्या स्थितीवर केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी आज माध्यमांना माहिती दिली.

देशातील कोरोनाच्या एकूण रुग्णांपैकी ९२ टक्के रुग्ण हे कोरोनामुक्त झाले आहेत. कोरोनाने १.३ टक्के रुग्णांचा मृत्यू झाला आहे, तर जवळपास ६ टक्के कोरोनाचे नवीन रुग्ण आहेत. महाराष्ट्रात करोनाचा आठवड्याचा पॉझिटिव्ही दर हा ६ टक्के झाला होता. तो आता वाढून २४ टक्क्यांवर गेला आहे. ही अतिशय चिंतेची बाब आहे. सर्वाधिक कोरोना रुग्ण असलेल्या जिल्ह्यांमध्ये महाराष्ट्राच्या ७ जिल्ह्यांचा समावेश आहे. कोरोनाने होणारे मृत्यू रोखणे आणि आरोग्य सेवा देणा-या यंत्रणेची सुरक्षा करणे या दोन गोष्टी या घडीला अतिशय महत्त्वाच्या आहेत. म्हणूनच सर्वांसाठी लसीकरण मोहीम सुरू करणे शक्य नाही, असे भूषण यांनी स्पष्ट केले.

५८ टक्के रुग्ण महाराष्ट्रात, मृत्यूचे प्रमाणही ३४ टक्के
देशातील एकूण रुग्णांपैकी ५८ टक्के रुग्ण हे महाराष्ट्रातून येत आहेत. कोरोनाने मृत्यू होणा-या रुग्णांमध्ये महाराष्ट्रातील ३४ टक्के रुग्णांचा समावेश आहे. महाराष्ट्रात फेब्रुवारीमध्ये ३००० रुग्ण आढळून येत होते. आता ही संख्या वाढून ४४ हजारांवर गेली आहे. राज्यात रोज ३२ ते २५० जणांचा कोरोनाने मृत्यू होत आहे, अशी माहिती भूषण यांनी दिली.

देशात सर्वाधिक रुग्ण पुण्यात
देशात सर्वाधिक रुग्ण हे पुण्यात आहेत. देशातील टॉप १० जिल्ह्यामध्ये पुणे, मुंबई, ठाणे, नागपूर, नाशिक, औरंगाबाद, अहमदनगर यांचा समावेश आहे. इतर तीनमध्ये दिल्ली, बेंगळुरू आणि छत्तीसगडमधील एका जिल्ह्याचा समावेश आहे.छत्तीसगड हे छोटे राज्य असूनही तिथे कोरोनाचे ६ टक्के रुग्ण आढळून येत आहेत, तर मृत्यू दर हा ३ टक्के आहे.

पंजाबमध्ये रुग्णांचे प्रमाण ३ टक्क्यांवर
देशात करोनाचे ३ टक्के रुग्ण हे पंजाबमधून येत आहेत, तर देशातील कोरोनाने होणा-या एकूण मृत्यूपैकी ४ टक्के पंजाबमधील आहेत. अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आणि मृतांची संख्या पाहता दिल्ली आणि हरयाणा पंजाबपेक्षा चांगल्या स्थितीत असल्याचे भूषण म्हणाले

पुण्यात कोरोनाची स्थिती हाताबाहेर?

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,478FansLike
169FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या