23.4 C
Latur
Tuesday, August 16, 2022
Homeराष्ट्रीयकेरळमध्ये मंकीपॉक्सचा दुसरा रुग्ण आढळला

केरळमध्ये मंकीपॉक्सचा दुसरा रुग्ण आढळला

एकमत ऑनलाईन

कन्नूर : मंकीपॉक्सच्या दुस-या रुग्णाची नोंद केरळमधील कन्नूर जिल्ह्यात झाली आहे, केरळच्या आरोग्य मंत्रालयाने याबद्दलची माहिती दिली आहे. यापूर्वी देखील केरळमध्ये परदेशातून परतलेल्या एका व्यक्तीला मंकीपॉक्सची लागण झाल्याचे समोर आले होते.

१२ जुलै रोजी हा रूग्ण केरळच्या त्रिवेंद्रम विमानतळावर दाखल झाला होता. या घटनेनंतर डब्ल्यूएचओ आणि आयसीएमआरने जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार सर्व पावले उचलली जात असल्याचे केरळच्या आरोग्य मंत्री वीणा जॉर्ज यांनी सांगितले होते.

दरम्यान केरळच्या आरोग्य मंत्री वीणा जॉर्ज यांनी याबद्दल माहिती दिली, कन्नूर येथील ३१ वर्षीय व्यक्तीवर सध्या परियाराम मेडिकल कॉलेजमध्ये उपचार सुरू आहेत. रुग्णाची प्रकृती समाधानकारक असल्याची माहिती आहे. त्याच्या जवळच्या व्यक्तींवर पाळत ठेवण्यात आली आहे, असे केरळच्या आरोग्य मंत्री वीणा जॉर्ज यांनी सांगितले.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या