38.1 C
Latur
Tuesday, June 6, 2023
Homeराष्ट्रीयकेरळमध्ये आणखी एका हत्तीचा मृत्यू

केरळमध्ये आणखी एका हत्तीचा मृत्यू

एकमत ऑनलाईन

कोची: फटाके भरलेले अननस खायला दिल्यानंतर गर्भवती हत्तीणीचा मृत्यू झाल्याची केरळमधली घटना ताजी असतानाच आता केरळमध्ये आणखी एका हत्तीचा मृत्यू झाला आहे. नीलांबूर जंगलात हा हत्ती मृतावस्थेत सापडला आहे. या हत्तीच्या अंगावर अनेक जखमा आढळल्या आहेत.

हत्तीच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आल्यानंतर त्याच्या मृत शरीरावर अंत्यसंस्कार करण्यात आले. हा हत्ती अत्यंत गंभीर जखमी होता. त्याच्यावर वन विभागाकडून उपचारही सुरु होते. गेल्या पाच दिवसांपासून त्याच्यावर उपचार सुरु होते. मात्र तो उपचारांना प्रतिसाद देत नव्हता. अखेर त्याचा मृत्यू झाला. एएनआयने या संदर्भातले वृत्त दिले आहे.

त्याच्या अंगावर अनेक जखमा होत्या. दुसºया हत्तीसोबत त्याची लढाई झाली असावी़ त्यामुळे या जखमा त्याच्या अंगावर आल्या असाव्यात असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

Read More  दोन कैद्यांपाठोपाठ, घाटीत उपचार घेत असलेले दोन पॉझिटिव्ह रुग्ण पळाले

Stay Connected

1,567FansLike
182FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या