23.1 C
Latur
Sunday, February 28, 2021
Home राष्ट्रीय आणखी एका रहस्यमयी आजाराचे संकट

आणखी एका रहस्यमयी आजाराचे संकट

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : देशात कोरोना व्हायरस आणि बर्ड फ्लूचे संकट असतानाच आता आणखी एका रहस्यमयी आजाराचा प्रकोप पाहायला मिळत आहे. देशात कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. कोरोनासारख्या महाभयंकर संकटाचा सामना करण्यासाठी देश सज्ज झाला असून खबरदारीचे सर्व उपाय केले जात आहेत. देशातील एकून कोरोनाग्रस्तांची संख्या ही एक कोटीच्या वर गेली आहे. तर लाखो लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. कोरोनाचे संकट असतानाच देशात बर्ड फ्लूचे संकट आले आहे. शेकडो पक्ष्यांचा बर्ड फ्लूमुळे मृत्यू झाला असून भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

नव्या आजाराने लोकांना विळखा घातला असून शेकडो लोकांना त्यांची लागण झाली आहे. या रहस्यमयी आजारामुळे लोकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाली असून प्रशासनाची ही चिंता वाढली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दक्षिण भारतातील आंध्र प्रदेशमध्ये या नव्या आजाराचे रुग्ण आढळून आले आहेत. पश्चिम गोदावरी जिल्ह्यातील कोमीरपल्ली गावात गेल्या ४५ दिवसांत तब्बल ७०० हून अधिक लोक आजारी पडले आहेत. तापासोबतच या गावामध्ये रहस्यमयी आजारीचे सारखीच लक्षणे ही २२ लोकांमध्ये आढळून आली आहेत.

मीडिया रिपोर्टनुसार, रहस्यमयी आजार असलेल्या लोकांनी एलरू येथील एका सरकारी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. याच दरम्यान आंध्र प्रदेशचे आरोग्य मंत्री अल्ला काली कृष्णा यांनी गावाचा दौरा केला आणि लोकांची विचारपूस केली. एकंदरीत परिस्थिती नेमकी कशी आहे हे जाणून घेतले. गावामध्ये मेडिकल कॅम्पचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच डॉक्टरांच्या अनेक टीम्स या गावागावात जाणून लोकांची तपासणी करत आहेत. तसेच या आजाराचा नेमका शोध घेण्यासाठी नमुने जमा करण्यात आले असून, त्याची तपासणी केली जात आहे.

छापेमारीत १७०० कोटींची संपत्ती उघडकीस

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,437FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या