21.4 C
Latur
Tuesday, July 27, 2021
Homeराष्ट्रीयदेशात दोन-तृतीयांश लोकांमध्ये कोरोनाविरुद्ध अँटीबॉडी

देशात दोन-तृतीयांश लोकांमध्ये कोरोनाविरुद्ध अँटीबॉडी

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : देशातील ४० कोटी लोकांना अजूनही कोरोना व्हायरसची लागण होण्याचा धोका आहे, तर दोन तृतीयांश लोकांमध्ये कोरोना व्हायरसविरूद्ध अँटीबॉडी आढळून आल्या आहेत. इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चचे (आयसीएमआर) महासंचालक डॉ. बलराम भार्गव यांनी नुकत्याच झालेल्या चौथ्या सीरो सर्व्हेचा हवाला देत मंगळवार दि़ २० जुलै रोजी ही माहिती दिली.

डॉ. बलराम भार्गव म्हणाले, चौथ्या सीरो सर्वेक्षणात ६ ते १७ वर्षे वयोगटातील २८९७५ लोक आणि ७२५२ आरोग्य कर्मचा-यांचा समावेश करण्यात आला होता. यापैकी ६२ टक्के लोकांनी लस घेतली नाही, तर २४ टक्के लोकांनी एक डोस घेतला आणि १४ टक्के लोकांनी दोन्ही डोस घेतले होते. तसेच, या सर्वेक्षणात सीरो-प्रीव्हलेंस ६७ टक्के आढळल्याचे डॉ. बलराम भार्गव यांनी सांगितले.

आयआयटी कानपूरच्या प्राध्यापकांनी एक दिलासादायक माहिती दिली आहे. आयआयटीचे प्रोफेसर मंिनद्र अग्रवाल यांनी गणिताच्या विश्लेषणाच्या ‘फॉर्म्युला’च्या आधारे दावा केला आहे की, तिसरी लाट दुर्स­या लाटेपेक्षा कमी धोकादायक असेल. तसेच, ऑक्टोबर ते नोव्हेंबर दरम्यान तिसरी लाट येण्याची शक्यता त्यांनी वर्तवली आहे.

८५ टक्के आरोग्य कर्मचा-यांना लागण
८५ टक्के आरोग्य सेवा कर्मचा-यांना कोरोनाची लागण झाली आहे. देशात कोरोनाची प्रकरणांमधील घट आणि लसीकरण, याशिवाय डॉ. बलराम भार्गव यांनी लोकांना कोरोना नियमांचे पालन करण्यास सांगितले आहे. तसेच, अनावश्यक प्रवास टाळण्याचा सल्ला देताना डॉ. बलराम भार्गव म्हणाले की, ज्या लोकांनी अँटी-कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत, त्यांनीच प्रवास केला पाहिजे.

ती परिस्थिती पुन्हा नको
देशासह जगभरातील कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव अद्याप संपलेला नाही. देशात कोरोनाची आलेली दुसरी लाट मोठी होती. यानंतर आता तिसरी लाट येणार असल्याचे सांगितले जात आहे. दुस-या लाटेदरम्यान उद्भवलेली परिस्थिती पुन्हा तिस-या लाटेत येऊ नये आणि त्यावर मात करण्यासाठी सरकारकडून प्रयत्न केले जात आहेत.

कर्नाटकात नवा मुख्यमंत्री २८ जुलैला?

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
199FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या