24.4 C
Latur
Monday, September 20, 2021
Homeराष्ट्रीयबाजारासह पर्यटनस्थळांवरील भयावह गर्दीची चिंता!

बाजारासह पर्यटनस्थळांवरील भयावह गर्दीची चिंता!

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : देशात कोरोना रुग्णांची संख्या कमी झाली असली तरी दुसरी लाट अद्याप पूर्णपणे ओसरलेली नसल्याचे केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे. रुग्णसंख्या कमी होत असल्याने केंद्र आणि राज्य सरकारांनी निर्बंध सैल केले आहेत. अनलॉकचा परिणाम एवढा झाली की, अनेक जण मनमानी करू लागले आहेत. बाजारांमध्ये आणि पर्यटन स्थळांवर मोठी गर्दी दिसून येत आहे. यामुळे केंद्र सरकारने चिंता व्यक्त केली असून, पुन्हा निर्बंध कडक करण्यात येतील, असा इशारा दिला आहे.

कोरोनाची दुसरी लाट आटोक्यात आली आहे. पण लाटेचा धोका अजूनही कायम आहे. हिल स्टेशनवरील गर्दीचे उदाहरण देत केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी धोक्याचा इशारा दिला आहे. अशा गर्दीमुळे देशात आटोक्यात आलेला कोरोना संसर्ग हा पुन्हा पसरू शकतो. कोरोनासंबंधी नियमांचे पालन होत नसल्यास निर्बंधांमध्ये दिलेली सर्व सूट मागे घेतली जाईल, असे अग्रवाल यांनी स्पष्ट केले. शिमला आणि मनाली या ठिकाणी कोरोनासंबंधीच्या मार्गदर्शक सूचनांचे उल्लंघन होत असल्याच्या कारणावरून हिमाचल प्रदेश सरकारला आरोग्य मंत्रालयाने पत्र लिहिले आहे, असे सूत्रांनी सांगितले.

हिल स्टेशनवरील गर्दीचे चित्र हे भयावह आहे. हिलस्टेशन्सवर जाणारे लोक कोविड-प्रोटोकॉलचे अनुसरण करीत नाहीत. त्यांनी शासकीय मार्गदर्शक तत्वांचा योग्य प्रकारे पालन करावे अन्यथा आम्ही पुन्हा निर्बंध लागू करू. आपण शासकीय मार्गदर्शक तत्त्वांचे पालन न केल्यास महामारी पुन्हा एक भयानक प्रकार येऊ शकते.कोरोनापासून बचावासाठी नागरिकांनी पूर्ण खबरदारी घेतली पाहिजे, असे आयसीएमआरचे संचालक डॉ. बलराम भार्गव यांनी सांगितले. आरोग्य मंत्रालयाने घेतलेल्या पत्रकार परिषदेत गर्दीचे अनेक ठिकाणचे फोटोही दाखवण्यात आले.

८० टक्के रुग्ण ९० जिल्ह्यांतून
देशात गेल्या ९ दिवसांपासून ५० हजारांहून कमी नवीन रुग्णांची नोंद होत आहे. देशात कोरोनाचे ८० टक्के नवीन रुग्ण हे ९० जिल्ह्यांमधून येत आहेत. महाराष्ट्र, तामिळनाडू, केरळ, ओडिशा, आंध्र प्रदेश, आसाम, कर्नाटकमधून कोरोनाचे नवीन रुग्ण अधिक आढळून येत आहेत. ज्या जिल्ह्यांमध्ये अधिक संसर्ग आहे, तिथे कोरोनाची दुसरी लाट अद्याप सुरू आहे, असे म्हणता येईल. देशातील काही जिल्ह्यांमध्ये पॉझिटिव्हिटी दर हा १० टक्क्यांहून अधिक आहे, असे आरोग्य मंत्रालयाने सांगितले.

नियमांचे पालन आवश्यक
कोरोनाची तिसरी लाट आपल्यासाठी आव्हान नाही, तर ती रोखण्यासाठी किंवा आटोक्यात आणण्यासाठी आपण काय काम किंवा उपाययोजना करू शकतो, हे महत्त्वाचे आहे. लाटेचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आपल्याला कोरोनासंबंधी नियमांचे आणि निर्बंधांचे योग्य पालन केले पाहिजे, असे आरोग्य मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.

कोरोनाची मगरमिठी सैल!
देशात थैमान घालणा-या कोरोनाच्या दुस-या लाटेची मगरमिठी आता सैल होताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून करोना संसर्गाचा वेग कमी झाला असून, गेल्या २४ तासांत ३४ हजार ७०३ नवे रुग्ण आढळून आले असून, ही मागील १११ दिवसांतील म्हणजे जवळपास तीन महिन्यांनंतर नीचांकी रुग्णसंख्या नोंदवली गेली आहे. तसेच देशातील रिकव्हरी रेटही ९७.१७ टक्क्यांवर पोहोचला आहे.

रुग्णसंख्येत ३० टक्के घट
देशात कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या अत्यंत खाली आली आहे. संख्येत जवळपास ३० टक्के घट झाल्याने आता देशातील कोरोनाची प्रकरणे ५ लाखांपेक्षा कमी झाली आहेत. मात्र, अजूनही काही राज्यांत पॉझिटिव्हिटी रेट १० टक्क्यांवर आहे. त्यामुळे हा चिंतेचा विषय असून, या राज्यांतील पॉझिटिव्हिटी रेट कमी करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी सांगितले.

देशातील ७३ जिल्ह्यांत तिस-या लाटेचा धोका?
आयसीएमआरचे महासंचालक डॉ. बलराम भार्गव यांनी देशातील ७३ जिल्ह्यांत कोरोनाच्या तिस-या लाटेची चिन्हे दिसत आहेत. कोरोनामुळे शरीरात रक्त गोठते. तसेच आणखी एक कारण म्हणजे लसीकरणानंतर पडून राहल्यामुळे रक्त गोठते. त्यासाठी आम्ही ब्लड थिनर देतो. आता सर्वसामान्यांनाही साथीच्या आजारावर नियंत्रण आणण्यासाठी पुढे यावे लागेल. गर्दीत सामुदायिक जबाबदारी पार पाडावी लागेल, असे सांगितले.

लातूर शहरातील ३५० पथविक्रेत्यांना ३५ लाखांचे कर्ज

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
196FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या