22.7 C
Latur
Wednesday, July 6, 2022
Homeराष्ट्रीयआधी माफी मागा, मगच यूपीत या

आधी माफी मागा, मगच यूपीत या

एकमत ऑनलाईन

लखनौ : उत्तर प्रदेशचे भाजप खासदार ब्रिजभूषण सिंह यांनी पुन्हा एकदा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना इशारा दिला आहे. यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात त्यांनी राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. ते म्हणाले आहेत की, जोपर्यंत राज ठाकरे आपला अहंकार सोडत नाहीत, तोपर्यंत त्यांच्यावर श्रीरामाची कृपा होणार नाही. जोपर्यंत त्यांचा अहंकार मोडत नाही, तोपर्यंत ते उत्तर भारतात येऊ शकणार नाही.

ते पुढे म्हणाले की, अयोध्येतील रहिवासी असल्याची शिक्षा अयोध्येतील लोकांना भोगावी लागत आहे. अयोध्येत काही समस्या आहेत, मी काही दिवसांत सर्वांना भेटेन आणि त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन त्यांना याबाबत माहिती देईन. ब्रिजभूषण सिंह म्हणाले की, खासदार असो, आमदार असोकिंवा महापौर असो, त्यांची जबाबदारी अयोध्येतील जनतेप्रती असली पाहिजे. कोणत्याही विशिष्ट व्यक्तीप्रती नाही.

मी कुणाच्या तरी कृपेने खासदार झालो आहे, असे या लोकांना वाटत आहे. मात्र कोणाच्या कृपने नाही तर जनतेच्या मतांनी मी खासदार झालो आहे. मी अशोक सिंघल, ऋषी संत आणि सरयू माता यांच्या साक्षीने पुन्हा एकदा स्पष्टपणे सांगतो की, मी अयोध्येतून निवडणूक लढवणार नाही आणि कोणी योग्य व्यक्ती निवडणूक लढवली तर मी त्याला मदत करेन, असे ते म्हणाले.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या