28.3 C
Latur
Friday, June 25, 2021
Homeराष्ट्रीयअ‍ॅपल आणि गुगलने त्यांच्या स्टोअरवरून TikTok ला हटवले

अ‍ॅपल आणि गुगलने त्यांच्या स्टोअरवरून TikTok ला हटवले

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : भारत सरकारने टिकटॉक, शेअरइट, ब्युटी प्लस या लोकप्रिय चिनी अ‍ॅपसह एकूण 59 अ‍ॅपवर बंदी घातल्याचा निर्णयानंतर १२ तासांच्या आतमध्ये भारतामध्ये गुगल प्ले स्टोअर आणि अ‍ॅपल अ‍ॅप स्टोअरवरुन हटवण्यात आलं आहे.

यासंदर्भातील माहिती एएनआय या वृत्तसंस्थेनं दिली आहे. अ‍ॅपल आणि गुगलने अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. तरी या दोन्ही महत्वाच्या प्लॅटफॉर्मवरुन हे अ‍ॅप हटवण्यात आल्याची माहिती आहे.

युझर्सला टिकटॉक अ‍ॅप नव्याने डाउनलोड करता येणार नाहीत. टिकटॉक हे एक व्हिडिओ मेकिंग अ‍ॅप असून जगभरामध्ये हे अ‍ॅप वापरणारे सर्वाधिक युझर्स भारतात आहेत. या अ‍ॅपच्या मदतीने अनेक जण रातोरात सेलिब्रिटी झाल्याचीही उदाहरणे आहेत.

अँड्रॉइड आणि आयओएस प्रणालींवर प्रचलित असलेल्या या अ‍ॅपकडून भारतीय वापरकर्त्यांची माहिती बेकायदा साठवून भारताबाहेरील सव्‍‌र्हरना पुरवली जात असल्याच्या तक्रारी विविध माध्यमांतून करण्यात आल्याचे केंद्र सरकारने म्हटलं आहे.

Read More  टिकटॉक,शेयर इट सह या ५९ ऍपवर सरकारची बंदी

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
202FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या