24.6 C
Latur
Sunday, October 24, 2021
Homeराष्ट्रीयअ‍ॅपलने मागितली कर्मचा-यांची माफी; विस्ट्रॉनकडून कर्मचा-यांच्या थकीत वेतनाची चूक मान्य

अ‍ॅपलने मागितली कर्मचा-यांची माफी; विस्ट्रॉनकडून कर्मचा-यांच्या थकीत वेतनाची चूक मान्य

एकमत ऑनलाईन

बंगळूरू : आमच्या टीमच्या सर्व सदस्यांची सुरक्षा आणि त्यांचे कल्याण याला कंपनी कायमच प्राधान्य देत आली आहे. बंगळुरू येथील विस्ट्रॉनच्या प्रकल्पात घडलेल्या घटनेचा आम्ही तपास करत आहोत आणि यादरम्यान कंपनीत कार्यरत असलेल्या अनेक कर्मचा-यांना वेळेवर वेतन दिले नसल्याचे समोर आले आहे. या बाबत आम्हाला वाईट वाटत असून, आम्ही सर्वच कर्मचा-यांची माफी मागत आहोत, असे अ‍ॅपलने म्हटले आहे.

भारतात आयफोनचे उत्पादन करणारी तैवानची कंपनी विस्ट्रॉनच्या बंगळुरूमधील कार्यालयात गेल्या आठवड्यात तोडफोड आणि जाळपोळीची घटना घडली होती. अनेक महिन्यांपासून थकीत असलेले वेतन न मिळाल्यामुळे संतप्त झालेल्या कर्मचा-यांनी ही तोडफोड केल्याची माहिती समोर आली होती. विस्ट्रॉनच्या बंगळुरुमधील कारखान्यात आयफोन आणि अन्य कंपन्यांसाठी मोबाइलची निर्मिती केली जाते. कर्नाटक सरकारने या हिंसाचाराबद्दल नाराजी व्यक्त केली होती. तसेच, कर्मचा-यांना त्यांचे थकीत वेतन मिळवून देण्याचेही आश्वासन दिले होते. दरम्यान, विस्ट्रॉन या कंपनीने कर्मचा-यांचे वेतन थकवल्याबद्दल माफी मागितली असून कंपनीच्या भारतातील उपाध्यक्षांचीही हकालपट्टी केली आहे.

अफगाणिस्तानात बॉम्बस्फोटात ९ ठार

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या