26.2 C
Latur
Thursday, August 11, 2022
Homeराष्ट्रीय२८,७३२ कोटींच्या शस्त्रास्त्र खरेदीला मंजुरी

२८,७३२ कोटींच्या शस्त्रास्त्र खरेदीला मंजुरी

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : संरक्षण मंत्रालयाने सशस्त्र ड्रोन, कार्बाइन आणि बुलेटप्रूफ जॅकेटसह संरक्षण दलांसाठी २८,७३२ कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीची शस्त्रे खरेदी करण्यास मंजुरी दिली आहे. राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या संरक्षण अधिग्रहन परिषदेच्या बैठकीत एलओसी वर तैनात सैनिकांच्या सुरक्षेसाठी बुलेटप्रूफ जॅकेटच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे असे संरक्षण मंत्रालयाने म्हटले आहे.

एलएसी आणि पूर्व सीमेवर पारंपारिक, हायब्रीड युद्ध आणि आतंकवाद विरोधी कारवायांसाठी त्यांना समाविष्ट करण्यासाठी मान्यता देण्यात आली आहे, असे संरक्षण मंत्रालयाने सांगितले. लष्करासाठी ४ लाख क्लोज क्वार्टर बॅटल कार्बाइन्स मंजूर करण्यात आल्या आहेत.

संरक्षण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार आधुनिक युद्धात भारतीय सैन्याची क्षमता वाढवण्यासाठी स्वायत्त पाळत ठेवण्यासाठी आणि सशस्त्र ड्रोनच्या स्वार्म्सच्या खरेदीला मान्यता देण्यात आली आहे. सागरी सुरक्षा वाढविण्यासाठी १४ जलद गस्ती जहाजे घेण्याच्या भारतीय तटरक्षक दलाच्या प्रस्तावालाही मंजुरी दिली आहे. यासोबतच नौदलाच्या १२५० किलोवॅट क्षमतेच्या मरीन गॅस टर्बाइन जनरेटरच्या अद्ययावतीकरणाच्या प्रस्तावालाही मान्यता देण्यात आली आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या