28.3 C
Latur
Friday, June 25, 2021
Homeराष्ट्रीयभारतात ‘स्पुटनिक लाईट’ वापरास मंजुरी

भारतात ‘स्पुटनिक लाईट’ वापरास मंजुरी

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : भारतात स्पुटनिक लाईट लसीच्या वापरास शुक्रवार दि़ ७ मे रोजी मंजुरी मिळाली असून, वेगाने लसीकरण करण्यासाठी स्पुटनिक लाईट ही भारतासाठी संजीवनी ठरणार आहे. आता केंद्र सरकारने या लसीला वापरासाठी मान्यता दिल्याने अनेकांना दिलासा मिळणार आहे. रशियामध्ये स्पुटनिक लसीचा आणखी एक प्रकार विकसित केला आहे. स्पुटनिक लाईट असे या लसीचे नाव असून, याचा एकच डोस पुरा असल्याचा दावा कंपनीने केला आहे.

यावूर्वी रशियन कंपनीची स्पुटनिक व्ही बाजारात उपलब्ध आहे. रशियाची पहिला लस स्पुटनिक व्ही कोविड १९ संसर्गाविरोधात ९७.६ टक्के प्रभावी आहे, असे वैज्ञानिकांनी सांगितले होते. ३.८ दशलक्ष लोकांच्या आकडेवारीवर ही माहिती आधारित आहे. भारताला स्पुटनिक व्ही लसीचे १.५ लाख डोस प्राप्त झाले आहेत. पुढील दोन दिवसांत आणखी १.५ लाख डोस पोहोचण्याचा अंदाज आहे.

रशियाने दिली ६ मे रोजीच मान्यता
रशियन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट फंडने ६ मे रोजी स्पुटनिक लाइट या लसीचा एक डोस वापरण्यास अधिकृत मान्यता दिली आहे. स्पुटनिक लाइट लसीचा एक डोस कोरोनाव्हायरस विरोधात ८० टक्के कार्यक्षम असल्याचे रशियन अधिकाºयांनी सांगितले आहे. आरडीआयएफच्या मते रशियाच्या गमलेया संस्थेने तयार केलेली लस कोविड १९ विरूद्ध ७९.४ टक्के प्रभावी आहे. स्पुटनिक लाईटची किंमत १० डॉलरपेक्षा कमी असणार आहे. सध्या या लसीला फक्त रशियात परवानगी मिळाली आहे. कोरोनाविरोधात स्पुटनिक व्ही जगातली पहिली रजिस्टर्ड होणारी लस होती.

शेता वनात चट मंगणी ,पट व्यहची सध्या चलती!

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
202FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या