23.1 C
Latur
Monday, August 2, 2021
Homeराष्ट्रीय२८ अन्न प्रक्रिया प्रकल्पांना मंजुरी

२८ अन्न प्रक्रिया प्रकल्पांना मंजुरी

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योगमंत्री नरेंद्र सिंंह तोमर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत ३२०.३३ कोटी रुपये खर्चाच्या अन्न प्रक्रिया प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली. १० राज्यात मंजूर झालेल्या या प्रकल्पांमुळे १० हजारांहून अधिक लोकांना रोजगार उपलब्ध होणार आहे. यात ईशान्य भारतातील ६ प्रकल्पांचा समावेश आहे.

व्हिडिओ कॉन्फरंिन्सगच्या माध्यमातून झालेल्या आयएमएसीच्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी नरेंद्रसिंह तोमर होते. पंतप्रधान किसान संपदा योजनेच्या (पीएमकेएसवाय) अंतर्गत अन्न प्रक्रिया आणि संरक्षण क्षमता वाढविणे, विस्तार (सीईएफपीपीसी) (घटक योजना) या प्रकल्पांचा विचार यावेळी विचार करण्यात आला. अन्नप्रक्रिया उद्योग राज्यमंत्री रामेश्वर तेली हे देखील या बैठकीला उपस्थित होते. प्रकल्पाच्या प्रवर्तकांनी देखील या व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये भाग घेतला.या २८ प्रकल्पांद्वारे मध्यप्रदेश, गुजरात, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, जम्मू काश्मिर, कर्नाटक, तामिळनाडू, उत्तराखंड, आसाम आणि मणिपूर या राज्यांमध्ये दररोज १२३७ मेट्रिक टन अन्न प्रक्रिया क्षमता तयार होईल.

‘रामकली’ रागाने दिवाळी पहाट बनली सुरेल

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
200FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या