24.8 C
Latur
Wednesday, October 5, 2022
Homeराष्ट्रीय३ उच्च न्यायालयांमध्ये २० न्यायाधीशांच्या नियुक्तीला मंजुरी

३ उच्च न्यायालयांमध्ये २० न्यायाधीशांच्या नियुक्तीला मंजुरी

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमने तीन उच्च न्यायालयांमध्ये २० न्यायाधीशांच्या नियुक्तीला हिरवी झेंडी दाखवली आहे. सरन्यायाधीश यूयू लळित यांच्या नेतृत्वाखालील सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमने पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालय, मुंबई उच्च न्यायालय आणि कर्नाटक उच्च न्यायालयात २० न्यायाधीशांच्या नियुक्तीला मान्यता दिली आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमने सोमवारी झालेल्या बैठकीत पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयातील न्यायाधीशांच्या पदावर ९ न्यायिक अधिका-यांना पदोन्नती देण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली. सुप्रीम कोर्टाच्या वेबसाइटवर अपलोड केलेल्या निवेदनानुसार, कॉलेजियमने मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून दोन वकिलांची नियुक्ती करण्याच्या प्रस्तावालाही मान्यता दिली. त्याचप्रमाणे ७ सप्टेंबर रोजी झालेल्या बैठकीत कॉलेजियमने ६ न्यायिक अधिका-यांना मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून बढती देण्यास मान्यता दिली होती. कॉलेजियमने ७ सप्टेंबरला झालेल्या बैठकीत कर्नाटक उच्च न्यायालयाचे स्थायी न्यायाधीश म्हणून तीन अतिरिक्त न्यायाधीशांची नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला होता.

पंजाब-हरियाणा उच्च न्यायालयाला मान्यता
गुरबीर सिंह, दीपक गुप्ता, अमरजोत भट्टी, रितू टागोर, मनीषा बत्रा, हरप्रीत कौर जीवन, सुखविंदर कौर, संजीव बेरी आणि विक्रम अग्रवाल यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

मुंबई उच्च न्यायालयासाठी नियुक्ती
मुंबई उच्च न्यायालयासाठी संजय आनंदराव देशमुख, यंशिवराज गोपीचंद खोब्रागडे, महेंद्र वधूमल चांदवाणी, अभय सोपानराव वाघवासे, रवींद्र मधुसूदन जोशी, वृषाली, शुभांगी विजय जोशी, संतोष गोंिवदराव चपळगांवकर, मिलिंद मनोहर साठे यांची नियुक्ती केली गेली. तर, कर्नाटक उच्च न्यायालयासाठी न्यायाधीश मोहम्मद घौस शुक्रे कमाल, न्यायाधीश राजेंद्र बदामीकर आणि न्यायाधीश खाजी जयबुन्निसा मोहिउद्दीन यांची नियुक्ती करण्यात आली.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या