22.1 C
Latur
Sunday, August 14, 2022
Homeराष्ट्रीयमुलांना दिल्या जाणा-या ‘कोव्होवॅक्स’ लसीला मंजुरी

मुलांना दिल्या जाणा-या ‘कोव्होवॅक्स’ लसीला मंजुरी

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : भारतीय औषध महानियंत्रकांनी (डीसीजीआय) ७ ते १२ वर्षांच्या मुलांसाठी सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या कोव्होवॅक्स लसीला मंजुरी दिली आहे.

यापूर्वी केंद्रीय औषधी प्राधिकरणाच्या एका तज्ञ समितीने सात ते १२ वयोगटातील मुलांसाठी कोव्होवॅक्स लसीला आपात्कालीन उपयोगासाठी मंजुरी देण्याची शिफारस केली होती. मात्र आता डीसीजीआयने त्यास मंजुरी दिली आहे.

कोव्होवॅक्सला केवळ आपात्कालीन स्थितीत मर्यादित वापरासाठी मंजुरी दिली गेली आहे. सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या सरकारी आणि नियामक विभागाचे संचालक प्रकाश कुमारसिंह यांनी १६ मार्च रोजी आपात्कालीन उपयोग प्राधिकरणासाठी अर्ज सादर केला होता.

यापूर्वी डीसीजीआयने २८ डिसेंबर रोजी प्रौढ नागरिकांना आपात्कालीन स्थितीत मर्यादित वापरासाठी कोव्होवॅक्सला मंजुरी दिली होती. नऊ मार्च रोजी १२-१४ वयोगटातील मुलांच्या लसीकरणास सुरुवात करण्यात आली होती. दुसरीकडे देशभरात कोरोना लसीकरण अभियानास गेल्या वर्षी १६ जानेवारीपासून सुरुवात झाली होती. त्यात आरोग्य कर्मचा-यांना पहिल्या टप्प्यात लस दिली गेली होती.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या