22.7 C
Latur
Wednesday, October 5, 2022
Homeराष्ट्रीयतेजस-२ मेगा प्रोजेक्टला मान्यता

तेजस-२ मेगा प्रोजेक्टला मान्यता

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : संरक्षण क्षेत्रात भारताची ताकद आणखी वाढणार आहे. तेजस-१ या लढाऊ विमानाच्या यशानंतर आता भारत सरकारने तेजसच्या २.० मेगा प्रोजेक्टला मान्यता दिली आहे. याअंतर्गत तेजसचे अधिक सक्षम आणि शक्तिशाली व्हर्जन तयार केले जाणार आहे. तेजस २.० मेगा प्रोजेक्ट अंतर्गत ५ व्या पिढीचे फायटर जेट बनवले जाईल.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील कॅबिनेट कमिटी ऑन सिक्युरिटीने ६,५०० कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या प्रोटोटाइप, फ्लाइट टेस्ट आणि सर्टिफिकेशनसाठी तेजस मार्क-२ विकसित करण्याच्या प्रकल्पाला मंजुरी दिली आहे. त्यासाठी अडीच हजार कोटी रुपये आधीच मंजूर झाले होते. सुपर क्रूझ क्षमता असलेल्या या पाचव्या पिढीतील लढाऊ विमानाच्या निर्मितीसाठी १५,००० कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेची कॅबिनेट कमिटी ऑन सिक्युरिटीची मंजुरी मिळण्यासाठी काही महिने लागतील.

तेजस मार्क-१ देखील अडव्हान्स असून ते वजनाने खूपच हलके आहे. हवाई दलाला मिग-२१, मिराज-२०००, जग्वार आणि मिग-२९ सारख्या लढाऊ विमानांच्या जागी तेजस मार्क-१ आणायचा विचार सुरू होता. हलके वजनाचे तेजस मार्क-१ हे प्रामुख्याने हवाई संरक्षणासाठी आहे. मध्यम वजनाचे मार्क-2 तेजस त्याच्या जड श्रेणीतील स्टँडऑफ शस्त्रे लढण्यास सक्षम आहे. भारतीय वायुसेनेने आतापर्यंत हिंदुस्थान एरोनॉटिक्सकडून मागवलेल्या १२३ तेजस विमानांपैकी ३० विमानांचा समावेश केला आहे.

तेजस मार्क-१ पेक्षा शस्त्रे वाहन्याची क्षमता अधिक
तेजस मार्क-२ मध्ये बसवलेले ९८ किलोन्यूटन थ्रस्ट क्लासचे शक्तिशाली जीई-४१४ इंजिन तेजसची लढण्याची क्षमता वाढवते. याशिवाय हे तेजस मार्क-१ पेक्षा जास्त शस्त्रे वाहून नेऊ शकते. त्यामुळे तेजस मार्क-२ चे वजन तेजस मार्क-१ पेक्षा किंचित जास्त असेल. तेजस मार्क-१ हे १३.५ टन आहे, तर मार्क-२ १७.५ टन आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या