22.4 C
Latur
Saturday, June 19, 2021
Homeराष्ट्रीयडीआरडीओच्या कोरोनावरील औषधाला मंजुरी

डीआरडीओच्या कोरोनावरील औषधाला मंजुरी

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : भारत सरकारच्या औषध नियामक संस्थेने डीआरडीओ बनवलेल्या २ डेक्सोय डी ग्लुकोज (२ -डीजी) च्या आपत्कालीन वापरासाठी मंजुरी दिली आहे. भारतातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता हा निर्णय घेण्यात आला आहे. डीआरडीओने २ डेक्सोय डी ग्लुकोजचे उत्पादन मोठ्या प्रमाणात करता येईल, असेही म्हटले आहे. डीआरडीओने याविषयी प्रसिद्धीपत्रक जारी केले आहे.

कोरोनाबाधित रुग्णांवर केल्या जाणा-या उपचारपद्धती ऐवजी २ डेक्सोय डी ग्लुकोजचा वापर पर्यायी उपचार पद्धती म्हणून केला जाईल. या औषधाची निर्मिती डीआरडीओच्या आयएमएस आणि डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीज यांनी एकत्रितपणे केली आहे. या औषधाच्या चाचण्या केल्या गेल्या तेव्हा याचा डोस घेतलेल्या रुग्णांमध्ये याची सकारात्मक लक्षण दिसून आली आहेत. रुग्णांचा बरा होण्याचा वेग चांगला असून ऑक्सिजनवरील अवलंबित्व कमी होते, असेही डीआरडीओकडून सांगण्यात आले आहे.

रुग्ण बरे होण्याचा वेग वाढणार
डीआरडीओने जारी केलेल्या माहितीनुसार २ डेक्सोय डी ग्लुकोजच्या रुग्णांना दिले गेले ते रुग्ण वेगाने रिकव्हर होतात. त्याचा बरा होण्याचा वेग नियमितपणे केल्या जाणा-या उपचार पद्धतीपेक्षा चांगला असल्याचा दावा करण्यात आला आहे. नियमित उपचार पद्धतीने रुग्ण बरा होण्यासाठी लागणारा वेळ आणि २ डेक्सोय डी ग्लुकोज दिलेले रुग्ण बरे होण्याचा वेळ यांच्यामध्ये जवळपास २.५ दिवसांचा फरक आढळून आल्याचे डीआरडीओकडून सांगण्यात आले आहे.

२ डेक्सोय डी ग्लुकोज कसे घ्यायचे?
डीआडीओने विकसित केलेले हे औषध पावडर स्वरुपात मिळते. हे पाण्यामध्ये टाकून घ्यावे लागते. हे औषध संसर्ग झालेल्या पेशींमधील विषाणूंचा संसर्ग कमी करण्यासोबत संसर्ग रोखण्याचे काम करत. त्यासोबतचे रुग्णाच्या शरीरातील उर्जा वाढवण्याचेही काम करते.

संशोधनाची सुरुवात कधी?
पहिल्या लाटेमध्ये शास्त्रज्ञांनी याविषयी संशोधन करण्यास सुरुवात केली. कामामध्ये त्यांना हैदराबादच्या सेंटर फॉर सेल्यलर अँड मॉलेक्युलर बायोलॉजीचे सहकार्य लाभले. संशोधनात त्यांना २ डेक्सोय डी ग्लुकोज कोरोना विषाणू विरोधात प्रभावी असल्याचे आढळून आले आहे. मे २०२० मध्ये कोरोना रुग्णांवर क्लिनिकल ट्रायल घेण्यासाठी डीसीजीआयने परवानगी दिली होती. देशातील ११ हॉस्पिटलमध्ये ११० रुग्णांवर चाचणी करण्यात आल्याचे, डीआरडीओने सांगितले.

महाराष्ट्र उत्तम लढाई लढतोय; पंतप्रधान मोदींकडून ठाकरे सरकारची स्तुती

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
203FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या