30.9 C
Latur
Monday, May 10, 2021
Homeराष्ट्रीयदेशभरात १६२ ऑक्सिजन प्लांट उभारण्यास मंजूरी!

देशभरात १६२ ऑक्सिजन प्लांट उभारण्यास मंजूरी!

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमिवर व्हेंटिलेटर बेडसह ऑक्सिजनची कमतरता मोठ्या प्रमाणात भासत आहे़ अशातच ऑक्सिजनचा तुटवडा भरून काढण्यासाठी देशातील १६२ ठिकाणांवर ऑक्सिजन निर्मितीचा प्लांट उभारण्याची मंजुरी रविवार दि़ १८ एप्रिल रोजी केंद्र सरकारच्या वतीने देण्यात आली़

कोरोनाबाधितांच्या वाढत्या रूग्णसंख्येमुळे देशातील आरोग्य व्यवस्थेवरील ताण मोठ्या प्रमाणात वाढला आहे. रूग्णालयांमध्ये खाटा, व्हेंटिलेटर, कोरोनाबाधितांसाठी आवश्यक असलेली औषधी तसेच ऑक्सिजनचा तुटवडा जाणवत आहे. अशात रूग्णांच्या मृत्यूसंख्येत वाढ नोंदवण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने देशभरात १६२ ऑक्सिजन प्लांट लावण्यास रविवारी मंजूरी दिली आहे.

१६२ पैकी ३३ ऑक्सिजन सयंत्र अगोदरपासूनच कार्यान्वित करण्यात आले असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आली आहे. या संपूर्ण प्लांट मधून जवळपास १५४.१९ मॅट्रिक टन ऑक्सिजनचे उत्पादन होईल, असेही मंत्रालयाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

महाराष्ट्राला एका सयंत्राची परवानगी
कार्यान्वित ऑक्सिजन सयंत्रापैकी मध्य प्रदेशात ५, हिमाचल प्रदेश ४, प्रत्येकी तीन संयंत्र चंदीगढ, गुजरात तसेच उत्तराखंडमध्ये तर, बिहार, कर्नाटक तसेच तामिळनाडूमध्ये प्रत्येकी दोन ऑक्सिजनचे सयंत्र कार्यान्वित करण्यात आले आहे. यासोबतच महाराष्ट्र, आंध्रप्रदेश, छत्तीसगढ, दिल्ली, हरियाणा, केरळ, पॉन्डिचेरी, पंजाब तसेच उत्तर प्रदेश मध्ये प्रत्येकी एक सयंत्र लावण्यात आले असल्याचे मंत्रालयाकडून सांगण्यात आले आहे.

५० हजार मेट्रिक टनची आयात करणार
कोरोनाची वाढती रूग्णसंख्या लक्षात घेता केंद्र सरकारने ५० हजार मॅट्रिक टन वैद्यकीय ऑक्सिजन आयात करण्याचा निर्णय घेतला आहे. काही दिवसांपूर्वी केंद्राकडून ५० हजार मॅट्रिक टन ऑक्सिजन आयात करण्यासाठी निविदा काढण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली होती. महाराष्ट्र, मध्यप्रदेश, गुजरात, उत्तर प्रदेश,दिल्ली, छत्तीसगढ, कर्नाटक, केरळ, तामिळनाडू, पंजाब, हरियाणा तसेच राजस्थानमध्ये वैद्यकीय ऑक्सिजनचा तुटवडा असल्याने मागणीत वाढ झाली आहे.

उद्या राज्यातून ऑक्सिजन एक्सप्रेस धावणार; ग्रीन कॉरिडोर तयार केला जाणार

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,494FansLike
184FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या