अंवतीपोरा : काश्मीरमधील अवंतीपोरा भागातील पडगामपोरा क्षेत्रातील सोमवारी रात्रीपासून लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे. मंगळवारी पहाटेच्या सुमारास एका दहशतवाद्याचा खात्मा लष्करांच्या जवानांनी केला.
ठार झालेल्या याच आतंक्याने दोन दिवसांपूर्वी म्हणजेच रविवारी काश्मीरी पंडित संजय शर्मा यांची हत्या केली होती. अकिब मुश्ताक (रा. पुलवामा) असे ठार झालेल्या आंतकवाद्याचे नाव आहे. आकिब हा अ-श्रेणीच्या दहशतवादी यादीतील आंतकवादी होता. त्याने सुरुवातीला हिजबुल मुजाहिद्दीनसाठी काम केले. गेल्या काही दिवसांपासून तो टीआरएफ या आतंकवादी संघटनेत कार्यरत होता.