नवी दिल्ली : आम आदमी पक्षाचे नेते आणि राज्यसभा खासदार संजय सिंह यांनी अग्निपथ योजनेवरून केंद्र सरकारवर पुन्हा एकदा गंभीर आरोप केले आहेत. स्क्रिनशॉट शेअर करत त्यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे.
भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच लष्कर भरतीमध्ये जात विचारली जात आहे असा आरोप त्यांनी मोदी सरकारवर केला आहे. संजय सिंह यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले आहे. मोदी सरकारचा गरीब चेहरा आता देशासमोर आला आहे. मोदीजी दलित/मागास/आदिवासींना सैन्य भरतीसाठी पात्र मानत नाहीत का? असा सवाल केला आहे.