नवी दिल्ली : लष्करप्रमुख जनरल एम. एम. नरवणे, सोमवार दि़ ५ जुलैपासून ब्रिटन तसेच इटलीच्या दौ-यावर जाणार आहेत. चार दिवसीय दौ-यादरम्यान ते संबंधित देशातील वरिष्ठ सैन्य अधिका-यांची भेट घेतली. ८ जुलैपर्यंत लष्करप्रमुख परराष्ट्र दौ-यावर राहणार असून, दौ-यादरम्यान संरक्षण सहकार्य वृद्धींगत करण्यासंबंधी विशेष भर दिला जाईल, अशी माहिती लष्कराकडून देण्यात आली आहे.
दौ-यादरम्यान लष्करप्रमुख भारतीय सेना स्मारकाचे उद्धाटन करतील. सोबतच रोममधील सेचिंगोला मध्ये सैन्यदलाच्या काउंटर आयईडी सेंटर ऑफ एक्सीलेन्सला भेट देतील. लष्करप्रमुख ५ आणि ६ जुलैला दोन दिवस ब्रिटेनचा दौरा करतील दौ-यादरम्यान सीओएएस संरक्षण राज्य सचिव, चीफ ऑफ डिफेंस स्टाफ, चीफ ऑफ जनरल स्टाफ तसेच इतर गणमान्य व्यक्तिसोबत ते चर्चा करतील. विविध सैन्य संरचनांचा दौरा करीत ते हितसंबंधाच्या मुद्यावर विचारांचे आदान-प्रदान करतील. दौ-याच्या दुस-या टप्प्यात लष्कप्रमुख इटलीच्या लष्क्राचे चीफ ऑफ डिफेंस स्टाफ तसेच चीफ ऑफ स्टाफ यांची भेट घेत चर्चा करतील.
ट्विटरच्या माहेश्वरीविरोधात नवी तक्रार दाखल