23.8 C
Latur
Tuesday, September 27, 2022
Homeराष्ट्रीयजम्मू-काश्मीरच्या शोपियानमध्ये लष्कराने केला दहशतवाद्यांचा खात्मा

जम्मू-काश्मीरच्या शोपियानमध्ये लष्कराने केला दहशतवाद्यांचा खात्मा

एकमत ऑनलाईन

श्रीनगर : जम्मू-काश्मीरमधील शोपियानमध्ये लष्कराने दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीच्या आधारे घटनास्थळी पोहोचलेल्या सुरक्षा जवानांनी दहशतवाद्यांना चारही बाजूंनी घेरले आणि त्यानंतर झालेल्या चकमकीत दोन दहशतवादी मारले गेले.

प्राथमिक माहितीनुसार, दोन्ही दहशतवादी लष्कराशी संबंधित होते आणि खो-यात अनेक दिवसांपासून दहशतवादी कारवायांमध्ये सक्रिय होते. लष्कराला त्यांच्या विरोधात जोरदार इनपुट मिळाले. याच इनपुटच्या आधारे लष्कराची तुकडी घटनास्थळी गेली आणि दहशतवाद्यांचा खात्मा केला. सध्या परिसराची नाकेबंदी करण्यात आली असून, शोध मोहीम सुरू आहे. सध्या खो-यात केवळ दहशतवादी घटनाच पहायला मिळत नाही तर मोठ्या प्रमाणावर दहशतवादी घुसखोरी करण्याचाही प्रयत्न करीत आहेत. काही दिवसांपूर्वी बीएसएफ जवानांनी सियालकोटचा रहिवासी मोहम्मद शबद याला अरनिया सेक्टरमध्ये घुसखोरी करताना पाहिले होते.

त्यानंतर लष्कराला गोळीबार करून घुसखोरी रोखावी लागली. याआधी २५ ऑगस्टलाही पाकिस्तानच्या एका घुसखोराने भारतीय सीमेत घुसण्याचा प्रयत्न केला होता. यादरम्यान बीएसएफने तस्करीचा मोठा डाव हाणून पाडला होता. सांबा जिल्ह्यात सीमेवर पाकिस्तानी घुसखोराकडून लष्कराने आठ किलोग्राम हेरॉईन जप्त केले. घुसखोरालाही गोळी मारली होती. मात्र, जखमी अवस्थेत तो पाकिस्तानच्या सीमेवर परत येण्यात यशस्वी झाला होता.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या