22 C
Latur
Friday, October 7, 2022
Homeराष्ट्रीयसैन्यभरती आधीच दोन गटांत गोळीबार

सैन्यभरती आधीच दोन गटांत गोळीबार

एकमत ऑनलाईन

मुरैना : मध्य प्रदेशातील मुरैना येथून एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. लष्कर भरतीच्या तयारीत असलेल्या दोन गटांमध्ये जोरदार लाठी, दगड आणि गोळीबार झाल्याचं सांगण्यात येत आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये दोन गटातील युवक एकमेकांशी भिडताना दिसत आहे.

दोन गटात हाणामारी कशामुळे झाली हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. सध्या पोलिस या घटनेचा तपास सुरू केला आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये दोन गटांमध्ये गोळीबाराचा आवाजही येत आहे. हे सर्व युवक सैन्याच्या अग्निवीर योजनेंतर्गत भरतीच्या तयारीसाठी या मैदानावर जमतात. या संपूर्ण प्रकरणाबाबत घटनास्थळी उपस्थित असलेल्या इतर काही प्रत्यक्षदर्शींचीही पोलीस चौकशी करत आहेत.

Stay Connected

1,567FansLike
189FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या