कोलकाता : प. बंगालमधील शिक्षक भरती घोटाळ््यातील मनी लाँड्रिंगची चौकशी करणा-या अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) शनिवारी माजी मंत्री पार्थ चॅटर्जी यांची विश्वासू अर्पिता मुखर्जीशी संबंधित ८ कंपन्यांची बँक खाती गोठवली.
चॅटर्जी यांनी या चौकशीत आपण नेत्यांच्या सूचनांनुसार अनेकांना नोक-या दिल्याचा खुलासा केला. अर्पिताच्या घरी २८ जुलैला टाकलेल्या धाडीत २८ कोटींची रोकड मिळाली.