22.8 C
Latur
Saturday, October 1, 2022
Homeराष्ट्रीयकलम ३७० पुन्हा लागू होणे शक्य नाही

कलम ३७० पुन्हा लागू होणे शक्य नाही

एकमत ऑनलाईन

श्रीनगर : जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री गुलाम नबी यांनी श्रीनगरमध्ये रॅली करून काश्मीरमध्ये कलम ३७० पुनर्स्थापित करणे शक्य नसल्याचे स्पष्ट केले. कलम ३७० पुनर्संचयित करता येणार नाही. ३७० पुनर्स्थापनेसाठी आहे. मी ३७० च्या नावावर इतर पक्षांना लोकांची पिळवणूक करू देणार नाही आणि ३७० च्या नावावर लोकांची दिशाभूल करू देणार नाही. ते परत येऊ शकत नाही, असेही त्यांनी सांगितले.

स्थानिक पक्षांवर निशाणा साधत ते म्हणाले की, राजकारणींच्या राजकीय शोषणामुळे काश्मीरमध्ये एक लाख लोकांचा बळी गेला आहे. पाच लाख मुले अनाथ झाली आहेत. मी खोटेपणा आणि शोषणावर मते मागणार नाही. मला निवडणुकीत त्रास झाला तरी मी तेच सांगेल की जे साध्य होऊ शकते.

नवा झेंडा सर्वधर्मीयांचे प्रतिक असणार
नवीन पक्षाचा झेंडा असा असेल जो प्रत्येक धर्माच्या लोकांना स्वीकारेल. पक्षाचा झेंडा आणि नाव काश्मीरमधील जनता ठरवेल, असे गुलाम नबी म्हणाले. काँग्रेसमधून राजीनामा दिल्यानंतर आझाद यांची ही पहिलीच रॅली होती. काँग्रेस हायकमांडचे नाव न घेता आझाद म्हणाले की, माझा नवा पक्ष काढण्याबद्दल ते नाराज आहेत, पण मला कोणाचेही नुकसान करायचे नाही.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या