24.2 C
Latur
Wednesday, July 6, 2022
Homeराष्ट्रीयअरुणाचल : दोन भारतीय जवान बेपत्ता

अरुणाचल : दोन भारतीय जवान बेपत्ता

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली: अरुणाचल प्रदेशातील भारत-चीन सीमेवरून लष्कराचे दोन जवान बेपत्ता झाले आहेत. हरेंद्र नेगी आणि प्रकाश सिंह राणा अशी या जवानांची नावे आहेत. राणा आणि नेगी २८ मेपासून बेपत्ता आहेत. बेपत्ता झालेले जवान उत्तराखंडचे रहिवासी आहेत. राणा आणि नेगी बेपत्ता असल्याची माहिती लष्कराच्या अधिका-यांनी त्यांच्या कुटुंबीयांना दिली. तेव्हापासून दोघांचे कुटुंबीय चिंतेत आहेत.

या प्रकरणी लष्कराने कोणतीही अधिकृत माहिती अद्याप प्रसिद्ध केलेली नाही. मूळचे रुद्रप्रयाग जिल्ह्यातल्या उखीमठचे रहिवासी असलेले राणा ७ व्या गढवाल रायफल्सचे जवान आहेत. अरुणाचल प्रदेशातील भारत-चीन सीमेवरील ठकला सीमेवर तैनात होते. गेल्या १३ दिवसांपासून ते बेपत्ता आहेत. प्रकाश सिंह राणा २८ मेपासून बेपत्ता असल्याची माहिती लष्कराकडून आम्हाला २९ मे रोजी देण्यात आल्याचे त्यांच्या पत्नी ममता यांनी सांगितले.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या