22.8 C
Latur
Thursday, July 7, 2022
Homeराष्ट्रीयअरविंद केजरीवाल : दिल्लीत हॉटेल सुरू करण्याचा मोठा निर्णय

अरविंद केजरीवाल : दिल्लीत हॉटेल सुरू करण्याचा मोठा निर्णय

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : राजधानी दिल्लीतील सामान्य जीवन रुळावर आणण्यासाठी आज अनलॉक -3 (Delhi Unlock-3) ची घोषणा करण्यात आली. यासाठी आज आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीत दिल्लीत हॉटेल सुरू करण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला.

यामुळे हॉटेल व्यवसायिकांनी आनंद व्यक्त केला आहे, मात्र जिममध्ये घाम गाळण्यासाठी दिल्लीकरांना आणखी वाट पहावी लागणार आहे. आज झालेल्या बैठकीत जिम उघडण्यास परवानगी देण्यात आलेली नाही. तसेच ट्रायल बेसिसवर साप्ताहिक बाजार सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे.

दिल्ली आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची महत्वाची बैठक बुधवारी पार पडली. या बैठकीत उपराज्यपाल बैजल, मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासह प्रशासनातील प्रमुख अधिकारी उपस्थित होते. बैठकीत दिल्लीतील कोरोना संक्रमणाच्या ताज्या परिस्थितीवर चर्चा झाली. तसेच हॉटेल, जिम आणि बाजार सुरू करण्यावर देखील चर्चा झाली.

कॅशबॅकच्या नावाखाली फसवणूक करणा-या बजाज फायनान्स कंपनीवर कारवाई करा

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या