24.7 C
Latur
Friday, September 30, 2022
Homeराष्ट्रीयजशी दारूची नशा असते, तशीच सत्तेचीही नशा असते

जशी दारूची नशा असते, तशीच सत्तेचीही नशा असते

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : अरविंद केजरीवाल यांचे राजकीय गुरू समजल्या जाणा-या अण्णा हजारेंनी केजरीवालांना नुकतंच एक पत्र लिहिले आहे. या पत्रात अण्णा हजारेंनी अरविंद केजरीवाल यांना दिल्लीतील दारूची दुकाने बंद करण्यास सांगितले आहे.

अण्णा हजारे म्हणाले, अरविंद केजरीवाल यांनी ‘स्वराज’ या पुस्तकात खूप काही बोलले होते. पण, त्याचा त्यांच्या आचरणावर कोणताही परिणाम दिसत नाहीय. अण्णांनी पत्रात अरविंद केजरीवालांना उद्देशून लिहिले आहे. तुम्ही मुख्यमंत्री झाल्यानंतर मी तुम्हाला पहिल्यांदाच पत्र लिहित आहे. गेल्या अनेक दिवसांपासून दिल्ली सरकारच्या दारू धोरणाबाबत येत असलेल्या बातम्या वाचून खूप वाईट वाटले. अण्णा पुढं म्हणाले, महात्मा गांधींच्या ‘गावाकडे चला’या विचारानं प्रेरित होऊन मी माझे आयुष्य गाव, समाज आणि देशासाठी समर्पित केलं आहे.

गेली ४७ वर्षे मी गाव विकासासाठी काम करत असून भ्रष्टाचाराविरोधात आंदोलन करत आहे. अरंिवद केजरीवाल यांना जुन्या दिवसांची आठवण करून देत अण्णा म्हणाले, तुम्ही आमच्या राळेगणसिद्धी या गावी आला आहात. इथं तुम्ही दारु, बिडी, सिगारेट इत्यादीवरील बंदीचं कौतुक केलं. राजकारणात येण्यापूर्वी तुम्ही ‘स्वराज’ नावाचं पुस्तक लिहिले होते. या पुस्तकात तुम्ही ग्रामसभा, दारू धोरणाबाबत मोठमोठ्या गोष्टी लिहिल्या होत्या. तेव्हा तुमच्याकडून खूप आशा होत्या; पण राजकारणात गेल्यावर आणि मुख्यमंत्री झाल्यानंतर तुम्ही आदर्श विचारसरणीला विसरलात, असे त्यांनी नमूद केले.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या