22.7 C
Latur
Wednesday, October 5, 2022
Homeराष्ट्रीयअफगाणींकडून १२०० कोटींचे तब्बल ३२५ किलो ड्रग्ज जप्त

अफगाणींकडून १२०० कोटींचे तब्बल ३२५ किलो ड्रग्ज जप्त

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने दोन अफगाण नागरिकांना अटक केली असून त्यांच्याकडून ३१२.५ किलो मेथाम्फेटामाइन आणि १० किलो हेरॉईन जप्त केले आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारात या ड्रग्जची किंमत १२०० कोटी रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे. दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या दोन्ही अफगाण नागरिकांची ओळख मुस्तफा आणि रहीमुल्लाह अशी झाली असून ते नार्को टेरर सिंडिकेटअंतर्गत मोठ्या प्रमाणावर ड्रग्जचा पुरवठा करत होते.

सुरुवातीला त्यांच्याकडून अल्प प्रमाणात अमली पदार्थ जप्त करण्यात आले होते. मात्र, नंतर चौकशी केली असता त्यांच्याकडे अमली पदार्थांचा एवढा मोठा साठा आढळून आला. याबाबतचा अधिक तपास दिल्ली पोलिस करीत आहेत.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या