24 C
Latur
Wednesday, October 5, 2022
Homeराष्ट्रीयसत्ता येताच शब्द फिरविला

सत्ता येताच शब्द फिरविला

एकमत ऑनलाईन

हैदराबाद : तेलंगण राष्ट्र समितीवर (टीआरएस) घणाघाती टीका करताना गृहमंत्री अमित शहा यांनी केवळ मतपेढीच्या राजकारणामुळे दुर्दैवाने इतकी वर्षे तेलंगणमध्ये हैदराबाद मुक्तिसंग्राम दिन साजरा होऊ शकला नाही, असे म्हटले आहे. सत्ता मिळताच त्यांनी शब्द फिरविला. अनेक नेत्यांनी आश्वासने दिली पण सोहळा झालाच नाही, असे ते म्हणाले. हा दिन साजरा करण्याचा निर्णय घेतल्याबद्दल त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले.

हैदराबाद मुक्तिसंग्राम दिनानिमित्त आज येथे विशेष सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. शहा म्हणाले की, ७५ वर्षांच्या काळात मतपेढीच्या राजकारणामुळे हा दिवस साजरा होऊ शकला नाही. हे खरोखरच मोठे दुर्दैव म्हणावे लागेल. निवडणूक आणि आंदोलनाच्या काळामध्ये अनेक नेत्यांनी अनेक आश्वासने दिली पण सत्तेत येताच रझाकारांच्या भीतीमुळे त्यांनी याकडे दुर्लक्ष केले.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या