21.1 C
Latur
Tuesday, September 28, 2021
Homeराष्ट्रीयरुग्णसंख्येचा आलेख चढताच

रुग्णसंख्येचा आलेख चढताच

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : देशात पुन्हा रुग्ण वाढत असून, गेल्या २४ तासात ४४ हजार २३० नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. यासोबतच देशातील एकूण कोरोनाबाधित रुग्णसंख्या ३ कोटी १५ लाख ७२ हजार ३४४ वर पोहोचली आहे. सर्वाधिक कोरोना रुग्णसंख्या नोंदवणा-या राज्यांमध्ये केरळ पहिल्या क्रमांकावर असून महाराष्ट्र दुस-या क्रमांकावर आहे.

केरळमधील परिस्थिती चिंताजनक असून २४ तासात २२ हजार ६४ रुग्णांची नोंद झाली, तर दुसरीकडे महाराष्ट्रात ७२४२ रुग्णांची नोंद झाली. यानंतर आंध्र पदेश (२१०७), कर्नाटक (२०५२) आणि तामिळनाडूचा (१८५९) क्रमांक आहे. जवळपास ८० टक्के रुग्णांची नोंद या पाच राज्यांमधून झाली असून एकट्या केरळमधून ५० टक्के रुग्णांची नोंद झाली आहे.

दरम्यान देशात अ‍ॅक्टिव्ह रुग्णसंख्या वाढली आहे. देशात गेल्या २४ तासांत १३१५ नवे अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आढळले असून यासोबत एकूण अ‍ॅक्टिव्ह रुग्णसंख्या ४ लाख ५ हजार १५५ वर पोहोचली आहे. तसेच गेल्या २४ तासांत ५५५ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. यासोबत देशात कोरोनामुळे जीव गमावलेल्यांची संख्या ४ लाख ३२ हजार २१७ झाली आहे.दुसरीकडे देशात गेल्या २४ तासांत ४२ हजार ३६९ रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत.

राज्यातही ६ हजार नवे रुग्ण
महाराष्ट्रातील कोरोना संसर्गाचे प्रमाण काहीसे कमी झाल्याचे दिसून येत असले, तरीदेखील अद्यापही दररोज नवीन कोरोनाबाधित आढळून येत आहेत. रोज आढळणारी कोरोनाबाधितांची संख्या कोरोनामुक्त झालेल्यांपेक्षा कधी कमी तर कधी जास्त आढळून येत आहे. आज दिवसभरात राज्यात ६ हजार ६०० नवीन कोरोनाबाधित आढळून आले, तर ७ हजार ४३१ रूग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. तसेच आज २३१ कोरोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झाला.

यूजीसी नेट परीक्षा कोरोनामुळे रद्द

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
194FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या