22.7 C
Latur
Wednesday, July 6, 2022
Homeराष्ट्रीयमंदिर मस्जिदवर आशुतोष राणांचे काव्य

मंदिर मस्जिदवर आशुतोष राणांचे काव्य

एकमत ऑनलाईन

मुंबई : सध्या देशात एका बाजुला महागाईचा भडका उडाला आहे. त्यातच दुसरीकडे हनुमान चालिसा, ज्ञानवापी मशिद, मथुरा, औरंगजेब कबर याशिवाय जात-धर्माच्या मुद्यांवरून राजकीय वातावरण तापले आहे. सध्याच्या या परिस्थितीत आशुतोष राणा यांचा एक व्हीडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. चार वर्षांपूर्वीचा हा व्हीडीओ असून तत्कालीन परिस्थितीबाबत त्यांना प्रश्न विचारण्यात आले होते.

देशातील वातावरणाबाबत त्यांनी तेव्हा व्यक्त केलेले मत आजही लागू होत असल्याचे नेटक-यांनी म्हटले आहे. सध्या देशाची हवा कशी आहे? असा प्रश्न केला असता ते म्हणाले, काही निर्णयांमुळे राग येतो कधी कधी रागांमुळेही बदल घडत असतो. एक अभिनेता म्हणून तुम्ही याकडे कसे पाहता यावर राणा म्हणाले की, कोणताही कलाकार नऊ रसांचे जीवन जगतो असतो. त्यापैकी एकही रस निघून गेला तर जगण्यात मजा नाही, असे त्यांनी स्पष्ट केले होते.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या