26.9 C
Latur
Monday, July 4, 2022
Homeराष्ट्रीयकुलगाममधील बँक मॅनेजरची हत्या

कुलगाममधील बँक मॅनेजरची हत्या

एकमत ऑनलाईन

कुलगाम : जम्मू-काश्मीरमधील कुलगाममध्ये गुरुवारी दहशतवाद्यांनी बँक कर्मचा-याची गोळया झाडून हत्या केली. काश्मीर फ्रीडम फायटर्स(केएफएफ) या दहशतवादी संघटनेने याची जबाबदारी स्वीकारली आहे. एवढेच नाही तर केएफएफने एक पत्र जारी करून इशाराही दिला आहे.

काश्मीरच्या लोकसंख्येच्या बदलात जो कोणी सहभागी असेल, त्याचे पण हेच हाल होईल, असे दहशतवादी संघटनेने म्हटले आहे. काश्मीर फ्रीडम फायटर्स या दहशतवादी संघटनेने पत्र जारी करून म्हटले आहे की, कुलगाममधील आमच्या कॅडरने गुप्त माहितीच्या आधारे ऑपरेशन केले. यामध्ये बँक कर्मचारी विजय कुमार यांचा मृत्यू झाला. काश्मीरच्या लोकसंख्येच्या बदलात जो कोणी सामील असेल त्याचा परिणाम असाच होईल.

मोदींना इशारा?
मोदींच्या नेतृत्वाखालील सरकार त्यांना येथे कायमस्वरूपी ठेवेल या फसवणुकीत जगणा-या बाहेरच्या लोकांसाठी हे डोळे उघडणारे आहे. यासाठी त्यांना आपला जीव गमवावा लागेल हे वास्तव आता बाहेरच्या लोकांनी समजून घेतले पाहिजे. विचार करा, अजून उशीर झालेला नाही. पुढचा नंबर तुमचा असू शकतो.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या