25.4 C
Latur
Wednesday, May 19, 2021
Homeराष्ट्रीयअमेरिका, यूके आणि जर्मनीकडून मदत भारतात दाखल

अमेरिका, यूके आणि जर्मनीकडून मदत भारतात दाखल

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : भारतात कोरोनाचा प्रादुर्भाव काही कमी होण्याचे नाव घेईना. वाढती रुग्णसंख्या, ऑक्सिजन आणि इतर सामग्रीचा निर्माण झालेला तुटवडा यामुळे कोरोनाचे संकट आणखी गडद होत चालले आहे. भारतात कोरोनाच्या नव्या रुग्णांची संख्या चार लाखाचा टप्पा लवकरच पार करेल, असेच चित्र सध्या दिसत आहे. या पार्श्वभूमीवर अनेक देशांतून भारताला मदत पाठवली जात आहे.

अमेरिकेने वैद्यकीय मदत पुरविणार असल्याचे याआधी जाहीर केले होते. त्यानुसार रेमडेसिवीर औषधाच्या सव्वा लाख बाटल्या (कुपी) घेऊन आलेले विमान सोमवार दि़ ३ मे रोजी सकाळी दिल्लीत दाखल झाले. दुसरीकडे भारतीय वायुसेनेने कोरोनाविरुद्धच्या लढ्यात कंबर कसली आहे. विविध देशातून भारतात किंवा देशांतर्गत कुठेही वैद्यकीय मदत पोहोचवण्यासाठी सध्या भारतीय वायुसेना आघाडीवर दिसत आहे. के सी-१७ विमानाने जर्मनीहून ४ क्रायोजेनिक ऑक्सिजन टँकर एअरलिफ्ट करत हिंडन विमानतळावर पोहोचवले. तर ४५० ऑक्सिजन सिलिंडर घेऊन ब्रिटनहून आलेले विमान चेन्नई विमानतळावर पोहोचले.

याबाबतची माहिती भारतीय वायुसेनेने दिली आहे. परदेशातून आणखी वैद्यकीय साधनसामग्रीची वाहतूक करण्याची गरज भासली, तर भारतीय नौसेनेच्या जहाजांनाही तयार राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. आखाती देश आणि दक्षिण-पश्चिम आशियामधील देशांतून वाहतुकीसाठी मोठी क्षमता असलेल्या जहाजांना तयार राहण्याचे आदेश दिले आहेत, अशी माहिती नौसेनेच्या अधिका-यांनी दिली.

ब्रिटनचे पंतप्रधान जॉन्सन आणि मोदींमध्ये आज चर्चा
उद्या मंगळवार दि़ ४ मे रोजी ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामध्ये एक व्हर्चुअल बैठक होणार आहे. याआधीच ब्रिटनने भारताला १ हजार व्हेंटिलेटर देण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे हॉस्पिटलमध्ये भरती असलेल्या रुग्णांची तब्येत सुधारण्यास मदत होईल. गेल्या आठवड्यात युकेने २०० व्हेंटिंलेटर, ४९५ ऑक्सिजन कन्सट्रेटर्स आणि तीन ऑक्सिजन जनरेशन युनिट देण्याचे जाहीर केले होते.

पश्चिम बंगालमध्ये पत्रकारही असतील कोविड वॉरियर्स

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,498FansLike
190FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या