25.6 C
Latur
Wednesday, August 10, 2022
Homeराष्ट्रीयअर्पिता मुखर्जीच्या घरावर ‘ईडी’चा छापा, रोकड जप्त

अर्पिता मुखर्जीच्या घरावर ‘ईडी’चा छापा, रोकड जप्त

एकमत ऑनलाईन

कोलकता : पश्चिम बंगालमध्ये शालेय भरती घोटाळ्याप्रकरणी केंद्रीय एजन्सी ईडीची कारवाई सुरू आहे. बुधवारी अंमलबजावणी संचालनालयाच्या अधिका-यांनी मंत्री पार्थ चॅटर्जी यांची जवळची सहकारी अर्पिता मुखर्जी यांच्या बेलघरिया, कोलकाता येथील फ्लॅटवर छापा टाकला. यावेळी मोठ्या प्रमाणात रोकड जप्त करण्यात आली.

नोटा मोजण्यासाठी पाच बँक अधिका-यांना पाचारण करण्यात आले असून यासोबतच रोख मोजणी यंत्रेही मागवण्यात आली आहेत. १५ कोटींहून अधिक रोकड सापडल्याची माहिती सूत्रांनी दिली. अजूनही नोटांची मोजणी सुरू आहे.

तीन किलो सोने, चांदीची नाणी आणि मालमत्तेची कागदपत्रेही जप्त करण्यात आले आहेत. अर्पिता मुखर्जी सध्या ईडीच्या कोठडीत आहे. प्रदीर्घ चौकशीनंतर त्याला नुकतीच अटक करण्यात आली. २२ जुलै रोजी ईडीने मुखर्जी यांच्या ठिकाणाहून २१ कोटी रुपयांची रोकड जप्त केली होती. त्यानंतर पार्थ चॅटर्जीलाही दीर्घ चौकशीनंतर अटक करण्यात आली.

यापूर्वी अर्पिता मुखर्जीकडून दोन डाय-या जप्त करण्यात आल्या होत्या. यातील एका डायरीमध्ये अर्पिता मुखर्जीने तिच्या बँक खात्यात जमा केलेल्या रोख रकमेची माहिती आहे. अर्पिता मुखर्जीकडे ही रोकड कुठून आली हे ईडीला जाणून घ्यायचे आहे. या डायरीमध्ये विविध बँकांमध्ये अनेक वेळा रोख रक्कम जमा केल्याचा तपशील आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या