29.2 C
Latur
Friday, May 7, 2021
Homeराष्ट्रीयक्रीडापटूंचा शेतकरी आंदोलनाला पाठिंबा

क्रीडापटूंचा शेतकरी आंदोलनाला पाठिंबा

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : मोदी सरकारने लागू केलेल्या तीन कृषि कायद्यांविरोधात दिल्लीत चालू असलेले शेतक-यांचे आंदोलन सलग सातव्या दिवशीही सुरुच आहे. पाच सदस्यांची समिती नेमून शेतक-यांच्या प्रश्नांवर तोडगा काढण्याचा सरकारचा प्रस्ताव शेतकरी नेत्यांनी फेटाळला आहे. दुसरीकडे शेतक-यांना समाजाच्या सर्वच स्तरामधून पाठिंबा वाढायला लागला आहे. माजी बास्केटबॉलपटू सज्जन सिंंह यांनी केंद्रसरकारला पुरस्कार परत करण्याचा इशारा दिला असून आणखी ३० माजी क्रिडापटूही पुरस्कार वापसीला तयार असल्याचे म्हटले आहे.

सज्जन सिंंह चीमा यांनी बॉस्केटबॉल या क्रिडाप्रकारात देशासाठी दैदिप्यमान कामगिरी केली होती. तत्कालि केंद्र सरकारने त्यांना पद्मश्री तसेच अर्जुन पुरस्काराने सन्मानित केले होते. मात्र सध्या चालू असलेल्या शेतकरी आंदोलनादरम्यान भाजपशासित राज्यसरकार व केंद्रसरकारकडून आंदोलन चिरडण्यासाठी शेतक-यांवर लाठीमार, पाण्याचे फवारे, अश्रुधुरांचा वापर असे अत्याचार केल्यामुळे व्यथित झाल्याचे मत त्यांनी मांडले असून अन्नदात्या शेतक-यावरच अत्याचार होणार असतील तर पुरस्कार बाळगून काय उपयोग अशी खंत त्यांनी व्यक्त केली आहे.

पुरस्कार परत करण्याचा इशारा त्यांनी केंद्रसरकारला दिला असून आपल्यासह ३० पेक्षा अधिक क्रीडापटूही याप्रश्नी पुरस्कार परत करण्याच्या मानसिकतेत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. सज्जनसिंह यांच्यासमेवत कुस्तीपटू करतास सिंह, हॉकीपटू राजबीर कौर आदी अर्जुन व तत्सम इतर पुरस्कारप्राप्त ३० खेळाडू राष्ट्रपतींकडे भेटीसाठी वेळ मागणार आहेत. राष्ट्रपतींनी वेळ न दिल्यास हे खेळाडू ५ डिसेंबर रोजी दिल्लीत जाऊन आपले पुरस्कार राष्ट्रपती भवनाबाहेर ठेऊन येणार आहेत, चीमा यांनी सांगितले आहे.

कुणाल कामरानंतर व्यंगचित्रकारावर कारवाई

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,493FansLike
183FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या