22 C
Latur
Friday, October 7, 2022
Homeराष्ट्रीयआपचे आमदार हाजी युनूस यांच्या गाडीवर हल्ला

आपचे आमदार हाजी युनूस यांच्या गाडीवर हल्ला

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : दिल्लीच्या मुस्तफाबाद विधानसभा मतदारसंघातील आम आदमी पक्षाच्या आमदाराने गाडीवर हल्ला झाला असल्याचा आरोप केला आहे. आपच्या या आमदाराने त्यांच्या चारचाकीवर पाच लोकांनी हल्ला केला असल्याची माहिती दिली आहे. या गाडीतून ते त्यांच्या मुलगा आणि मुलीसह प्रवास करत होते. आपचे आमदार हाजी युनूस यांनी या संपूर्ण घटनेचा व्हीडीओ ट्विट करत दिल्ली पोलिसांकडे हल्लेखोरांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

दरम्यान, या व्हीडीओची दखल घेत दिल्ली पोलिसांनी आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करून कारवाई सुरू केली आहे. आमदार हाजी युनूस यांनी व्हीडीओ ट्विट केला आहे. यात त्यांनी लिहले आहे की माझ्या गाडीवर काही समाजकंटकांनी हल्ला केला आहे. यावेळी माझी मुल त्या गाडीत होती. दारूच्या नशेत पाच तरुण पांढ-या रंगाच्या स्कॉर्पिओमध्ये होते. त्यांनी अचानक माझी गाडी त्यांनी थांबवली आणि गैरवर्तन करण्यास सुरुवात केली. दिल्ली पोलिसांनी यांची कृपया दखल घ्यावी.

Stay Connected

1,567FansLike
189FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या