नवी दिल्ली : काँग्रेस व त्यांचे सहकारी पक्ष प्रसारमाध्यमांच्या स्वातंत्र्यावर गदा आणत असून, माध्यमांवरील हल्ला खपून घेणार नसल्याची टीका आज शुक्रवार दि़ ९ ऑक्टोबर रोजी माहिती व प्रसारण केंद्रीयमंत्री प्रकाश जावडेकर यांनी केली आहे.
मुंबई पोलिसांनी गुरूवारी मोठा टीआरपी घोटाळा उघड केला आहे. जाहिरीती मिळवण्यासाठी टीआरपी वाढवणा-या रिपब्लिक या वृत्तवाहिनीसह फक्त मराठी , बॉक्स सिनेमा आदी वाहिन्यांचा यात समावेश असल्याची माहिती मुंबई पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी दिली. टीआरपी प्रकरणावरून केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका केली. माध्यमांच्या स्वातंत्र्यावर हल्ला करणे जनता कधीही सहन करणार नाही, असे त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.
प्रसारमाध्यमांचे स्वातंत्र्य लोकशाहीचे वैशिष्ट्य
प्रसारमाध्यमांचे स्वातंत्र्य हे आपल्या लोकशाहीचे वैशिष्ट्य असून घटनेतले आदर्श तत्व आहे. प्रसारमाध्यमांची गळचेपी भारतीय जनता सहन करणार नाही. काँग्रेस व तिचे सहकारी पक्ष प्रसारमाध्यमांच्या स्वातंत्र्यावर गदा आणत आहेत. हे लोकशाहीच्या मूल्यांविरोधात असून अस्वीकारार्ह आहे, असे जावडेकर यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.
लोकशाही काय? शिकायला हवे : नड्डा
भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष यांनीही या प्रकरणावरून महाराष्ट्र सरकारवर टीका केली आहे. कॉंग्रेस आणि त्यांच्या सहकारी पक्षाला असे वाटते की माध्यमांच्या विरोधात अशी कारवाई केल्याने त्यांचे अपयश लपवता येईल. तर ही त्यांची चूक आहे. लोकशाही काय आहे हे त्यांनी शिकायला हवे असे नड्डा यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.
आयएसआयला माहिती पुरवणा-याला नाशिकमध्ये अटक