23.2 C
Latur
Sunday, November 29, 2020
Home राष्ट्रीय वाहनांचा लेखाजोखा आता थेट पोर्टलवर; १ ऑक्टोबरपासून नियम लागू

वाहनांचा लेखाजोखा आता थेट पोर्टलवर; १ ऑक्टोबरपासून नियम लागू

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : वाहतुकीचे नियम अधिक कडक करतानाच वाहनांच्या कागदपत्रांचे डिजिटलायजेशन करण्याच्या दृष्टीने केंद्र सरकारने पावले उचलली आहेत. त्याचाच एक भाग म्हणून १ ऑक्टोबरपासून वाहनांशी संबंधित सर्व कागदपत्रे अर्थात ड्रायव्हिंग लायसन्स, ई-चालान यासारखा लेखाजोखा एका पोर्टलवर ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे इलेक्ट्रॉनिक माध्यमातून थेट दस्तावेज प्रमाणित करता येणे शक्य असून, आता वाहनधारकांना कागदपत्रे किंवा दस्तावेज देण्याची गरज पडणार नाही. लायसन्स विभागाने निष्क्रिय केलेल्या ड्रायव्हिंग लायसन्सची माहितीदेखील पोर्टलवर राहील आणि ती वेळोवेळी अपडेट केली जाईल, असे केंद्रीय रस्ते वाहतूक तथा राज्यमार्ग मंत्रालयाने सांगितले.

केंद्रीय रस्ते वाहतूक तथा राज्यमार्ग मंत्रालयाने यासंदर्भात नुकतीच अधिसूचना जारी केली होती. वाहतूक व्यवस्थेत माहिती तंत्रज्ञान तथा इलेक्ट्रॉनिक माध्यमांचा वापर केल्याने वाहतूक नियमांचे तंतोतंत पालन होण्यास मदत होईल. यातून वाहनचालकांना निष्कारण होणारा त्रास कमी होण्यास मदत होईल, असे स्पष्ट करण्यात आले. भ्रष्टाचार कमी करण्यासाठी तंत्रज्ञानसुद्धा अपडेट करण्यात आले आहे. त्यामुळे नियमांनुसार वाहनांशी संबंधित कोणत्याही कागदपत्रांची इलेक्ट्रॉनिक पद्धतीने पडताळणी करण्यात येईल. आता पोलिस अधिकारी त्याची शारीरिक प्रत विचारू शकणार नाहीत. यात ड्रायव्हरने नियमांचे उल्लंघन केल्याची प्रकरणेदेखील समाविष्ट असतील. पोर्टलवर कागदपत्रांची जप्तीदेखील इलेक्ट्रॉनिक पद्धतीने केली जाईल. त्यानंतर या दस्तावेजाचा तपशील क्रमश: नोंदविला जाईल, अशा रेकॉर्ड नियमित अंतराने पोर्टलवर प्रदर्शित केल्या जातील, असेही सांगण्यात आले.

मोटार वाहन (दुरुस्ती) कायद्याअंतर्गतची ही नवी नियमावली १ ऑक्टोबरपासून लागू करण्यात येत आहे. गेल्या वर्षी केंद्र सरकारने या कायद्यात अनेक सुधारणा लागू केल्या. त्यात परिवहन नियम, रस्ता सुरक्षा आदी नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल मोठ्या दंडाची तरतूद करण्यात आली आहे. आता सर्व नोंदी पोर्टलवर होणार असल्याने वाहनधारकांचा त्रासदेखील ब-याच प्रमाणात कमी होणार असून, निष्कारण अडवणुकीला आळा बसणार आहे, असे केंद्रीय मंत्रालयाचे म्हणणे आहे.

कहीं ये ‘वो’ तो नहीं…

वेबपोर्टलच्या माध्यमातून नोंदी
केंद्रीय मोटर वाहन नियमांत केलेल्या नव्या सुधारणांनुसार वाहनांशी संबंधित परवाने, नोंदणीची कागदपत्रे, फिटनेस प्रमाणपत्र, परवानगी आदींशी संबंधित महत्त्वपूर्ण कागदपत्रे शासकीय वेबपोर्टलच्या माध्यमातून नोंदी ठेवण्यात येतील. याशिवाय कंपाऊंडिंग, इम्पाऊंडिंग, एन्डोर्समेंट, निलंबन व परवाना रद्द करणे, ई-चालान नोंदणी ही सर्व कामे इलेक्ट्रॉनिक पोर्टलद्वारे केले जातील.

अनावश्यक तपासणीला लागणार ब्रेक
कोणतीही कागदपत्रे मागितल्यानंतर किंवा तपासणी केल्यानंतर तपासणीचा दिनांक व वेळ शिक्का आणि गणवेशातील पोलिस अधिका-यांच्या ओळखीची नोंद पोर्टलवर ठेवली जाईल. त्यात राज्याद्वारे अधिकृत अधिका-यांचा तपशीलदेखील असेल. यामुळे वाहनांच्या अनावश्यक तपासणीचा किंवा तपासणीचा ओढा कमी होईल आणि वाहनचालकांना त्रास होणार नाही.

वाहन चालविताना फोनवर बोलल्यास ५ हजारांपर्यंत दंड
केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने सांगितले की, वाहन चालवताना मोबाईल फोनचा वापर केला जाऊ शकतो. परंतु हा केवळ मार्ग शोधण्यासाठी नॅव्हिगेशनसाठीच असावा. मात्र, त्याचवेळी वाहन चालविताना लक्ष विचलित होणार नाही, याची काळजी घ्यावी लागेल. वाहन चालविताना फोनवर बोलताना पकडल्यास १ हजार ते ५ हजार रुपये दंड होऊ शकतो, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. रद्द केलेला किंवा अपात्र वाहनचालक परवान्याचे पोर्टलवर रेकॉर्ड ठेवले जाईल. यामुळे अधिका-यांना ड्रायव्हरच्या वागण्यावर लक्ष ठेवण्यास मदत होईल.

औरंगाबाद घाटी रुग्णालयाच्या चौथ्या मजल्यावरून उडी मारून कोविड रुग्णाची आत्महत्या

ताज्या बातम्या

केंद्र सरकारला सत्तेची नशा

नवी दिल्ली : शेतक-यांच्या आंदोलनावरून आता राजकारणही तापू लागले आहे. केंद्र सरकारने दिलेले प्रस्ताव शेतक-यांच्या नेत्यांकडून फेटाळण्यात आले आहेत. तसेच, आपण बुराडीमध्ये आंदोलन करणार...

…आता आव्हानांना भिडा !

राजकीय चमत्कार संबोधल्या गेलेल्या देशातील एका अनपेक्षित व अकल्पित राजकीय प्रयोगाची वर्षपूर्ती झाली आहे. ‘हे होणेच अशक्य’ ते ‘टिकणे अशक्यच’ इथवरचे दावे होत असताना...

सगळे सापळे चुकवत आघाडीची वर्षपूर्ती !

राज्यातील शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस-कॉँग्रेस आघाडीच्या सरकारने परवा आपला एक वर्षाचा कार्यकाळ पूर्ण केला. हा टप्पा फार मोठा. जन्माला आल्यापासून ज्याच्या आयुष्याविषयी सातत्याने शंका व्यक्त केल्या...

हाती फक्त खबरदारी!

कोरोनाच्या दुस-या लाटेची धास्ती सर्वांनाच आहे. राजधानी दिल्लीत कोरोनाच्या संसर्गाचा वेग प्रचंड प्रमाणात वाढतो आहे. गेल्या काही दिवसांतच सहा हजारांपेक्षा अधिक लोकांना संसर्ग झाला...

केवळ भाजपवालेच भारतीय आहेत का? : मुफ्ती

श्रीनगर : जम्मू काश्मीरमध्ये जिल्हा विकास परिषदेच्या (डीडीसी) पहिल्या टप्प्यातील निवडणूक पार पडल्या. त्यानंतर मुफ्ती यांनी रविवारी माध्यमांशी संवाद साधला. ते मुस्लिमांना पाकिस्तानी संबोधतात....

मतदान प्रक्रियेवर कंट्रोल रुममधून नजर

लातूर : महाराष्ट्र विधान परिषदेच्या ०५-औरंगाबाद पदवीधर मतदार संघासाठी मंगळवार दि. १ डिसेंबर रोजी सकाळी ८ ते सायंकाळी ५ यावेळेत लातूर जिल्ह्यातील एकुण ८८...

‘शाहू’चे तीन विद्यार्थी राज्यात प्रथमच्या यादीत

लातूर : कोरोनाच्या अभूतपूर्व परिस्थितीमध्ये १ ते २० ऑक्टोबरदरम्यान सीबीटी पद्धतीने ३२ सत्रांमध्ये झालेल्या परीक्षेत अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र व कृषी महाविद्यालयातील प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या एमएचटी-सीईटी...

३५ कोरोना पॉझिटिव्ह : एकाचा मृत्यू

नांदेड : चाचण्या वाढताच जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्येतही वाढ होत आहे.मागील आठवड्यात बाधितांचा आलेख वाढला होता. रविवारीचा दिवस थोडासा दिलासादायक ठरला. रविवारी सायंकाळी प्राप्त...

नांदेड जिल्ह्यात महिन्याभराने लॉकडऊन वाढले

नांदेड : कोरोना विषाणुंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय योजनाच्या अनुषंगाने नांदेड जिल्ह्यात ताळेबंदीचा (लॉकडाउन) कालावधी गुरुवार ३१ डिसेंबरपर्यंत वाढविण्यात आला आहे. याबाबतचे आदेश जिल्हादंडाधिकारी...

आले विभागीय आयुक्तांच्या मना… तेथे कोणाचे चालेना

नांदेड : ऐन कोरोनाच्या संकट काळातही राज्याला घसघसीत महसुल देणारे दारू दुकाने औरंगाबाद पदवीधर मतदार संघ निवडणूकीच्या मतदान दिवशी दि.१ डिसेंबर रोजी केवळ सायंकाळी...

आणखीन बातम्या

केंद्र सरकारला सत्तेची नशा

नवी दिल्ली : शेतक-यांच्या आंदोलनावरून आता राजकारणही तापू लागले आहे. केंद्र सरकारने दिलेले प्रस्ताव शेतक-यांच्या नेत्यांकडून फेटाळण्यात आले आहेत. तसेच, आपण बुराडीमध्ये आंदोलन करणार...

केवळ भाजपवालेच भारतीय आहेत का? : मुफ्ती

श्रीनगर : जम्मू काश्मीरमध्ये जिल्हा विकास परिषदेच्या (डीडीसी) पहिल्या टप्प्यातील निवडणूक पार पडल्या. त्यानंतर मुफ्ती यांनी रविवारी माध्यमांशी संवाद साधला. ते मुस्लिमांना पाकिस्तानी संबोधतात....

मोदींनी अंबानी-अदानींचे उत्पन्न दुप्पट केले

नवी दिल्ली : केंद्र सरकारने आणलेल्या नव्या कृषी कायद्यांना शेतक-यांच्या विरोधात अजूनही सुरू आहे. दिल्लीच्या सीमेवर आंदोलक शेतक-यांनी सरकारचा चर्चेचा प्रस्तावही फेटाळून लावला आहे....

लस प्रभाव तपासण्यासाठी अधिक डेटाची गरज

जिनिव्हा : कोरोनाचे जगभरात थैमान सुरू असताना दुसरीकडे लस विकसित करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. संपूर्ण जगाचे लक्ष ऑक्सफर्ड-एस्ट्राजेनकाच्या लसीकडे लागले आहे. मात्र, या लसीच्या...

आता ‘पीयूसी’ नसल्यास वाहनाचे नोंदणी प्रमाणपत्र जप्त होणार

नवी दिल्ली : देशभरातील वाहनांना पल्यूशन अंडर कंट्रोल(पीयूसी) प्रमाणपत्र आता बंधनकारक करण्यात आले असून, आगामी १ जानेवारी २०२१ पासून वाहनचालकाकडे पीयूसी सर्टिफिकेट नसेल तर...

नक्षलवाद्यांच्या स्फोटात अधिकारी शहीद

रायपूर : छत्तीसगडमधील सुकमा जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी केलेल्या आयईडी च्या स्फोटामध्ये सीआरपीएफ च्या कोब्रा कमांडो युनिटचा एक अधिकारी शहीद झाला. तर ९ कमांडो जखमी झाले,...

अमित शहांचा प्रस्ताव आंदोलकांनी फेटाळला

नवी दिल्ली : कृषि कायद्यांविरोधात आंदोलनाचा आज चौथा दिवस आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शनिवारी आंदोलकांशी चर्चेचा प्रस्ताव मांडला होता. तो शेतक-यांनी धुडकाऊन...

हैदराबाद भाग्यनगर होणार नाही

हैदराबाद : ग्रेटर हैदराबाद महानगरपालिका निवडणुकीत चांगलीच दंगल सुरु झाली असून आव्हाने-प्रतिआव्हानांना ऊत आला आहे. शनिवारी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मल्काजगिरी या...

शेतकरी आंदोलकांवर दंगलीचे गुन्हे

पाराओ : दिल्ली चलो आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केंद्रातील भाजपसरकारकडून चालू आहे. शांततामय पद्धतीने आंदोलन करणा-या शेतक-यांवर पोलिसांकडूनच पाण्याचे फवारे, अश्रुधर सोडण्यात आले. मात्र त्याला...

जेव्हा तिकीट हवे असते, तेव्हाच जात आठवते

नागपूर : केंद्रीय मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी यांनी राज्यातील पदवीधर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सभा घेताना जातीपातीच्या राजकारणावरुन टीका केली आहे. कार्यकर्त्यांमध्ये जात...
1,350FansLike
121FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या

मोहोळ तालुक्यातील प्रेमीयुगुलांची गळफास घेऊन आत्महत्या

सोलापूर : प्रेमसंबंध घरातील व नातेवाईकांना समजेल या भीतीपोटी प्रेमी युगुलाने एकाच लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना नरखेड गुरुवारी पहाटेच्या सुमारास घडली. प्रशांत...

लातुरच्या इतिहासाचा नवा पैलू ८६ वर्षानंतर उजेडात

लातूर : तब्बल ८६ वर्षाच्या प्रतिक्षेनंतर येथील पापविनाशक मंदिरातील चालुक्य कालीन शिलालेखाच्या दोन भागांचे वाचन करण्यात आले असून त्यातून लातूर नगरीचे समृद्ध आध्यात्मिक, बौद्धिक...

अमोल जगताप आत्महत्येप्रकरणी पाच जणांना जामीन मंजूर

अमोल अशोक जगताप आत्महत्येप्रकरणी अटकेत असलेले व्यंकटेश पप्पांना डंबलदिनी वय 47 खंडू सुरेश सलगरकर वय 28 दशरथ मधुकर कसबे वय 45 लक्ष्‍मण उर्फ काका...

पानगाव ग्रामपंचायतच्या कारभाराविरोधात भीक मांगो आंदोलन

पानगाव : ग्रामपंचायतच्या ढिसाळ कारभाराचा निषेधार्थ मनसे तालुका उपाध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य इम्रान मणियार व मनसे शहराध्यक्ष तथा पानगाव ग्रामपंचायत सदस्य चेतन चौहान यांच्या...

काँग्रेसतर्फे सोलापुरात मोदी यांचा निषेध

सोलापुर :  मुस्लिम शासक तुघलकाप्रमाणे चित्र विचित्र निर्णय घेऊन देशाच्या अर्थव्यवस्थेची वाट लावणाऱ्या, युवकांना बेरोजगार करणाऱ्या, उद्योगधंदे बंद पाडणाऱ्या, नोटबंदीचा चुकीचा निर्णय घेणाऱ्या, सरकारी...

सुल्लाळीच्या कपीलची मालिकांमधून चमकदार कामगिरी

ओमकार सोनटक्के जळकोट : तालुक्यातील अतिशय डोंगरी भागात तिरु नदीच्या काठी सुल्लाळी हे लहानसे खेडेगाव आहे परंतु मनात जर जिद्द असेल आणि काही करून...

धक्कादायक : लातूर जिल्ह्यात कहर सुरूच : आणखी ५८ रुग्णांची भर

लातूर शहरात सापडले सर्वाधिक रुग्ण : लातूर-२५, अहमदपूर-८, निलंगा-७, औसा-६, देवणी-६, उदगीर-६ : काळजी घ्या; मास्क वापरा, गर्दीची ठिकाणे जाण्याचे टाळा लातूर : जिल्ह्यातून गुरुवारी...

६५ वर्षावरील कलाकार व क्रू सदस्यांना चित्रीकरणास परवानगी -अमित विलासराव देशमुख

सांस्कृतिक कार्य मंत्री अमित विलासराव देशमुख यांची माहिती मुंबई - चित्रपट, दूरचित्रवाणी मालिका, ओटीटी उद्योग यांच्याशी सहयोगी असलेल्या ६५ वर्षांवरील कलाकार/क्रू सदस्यांना कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर आवश्यक...