27 C
Latur
Thursday, August 18, 2022
Homeराष्ट्रीयऑटोला आग, ५ ठार

ऑटोला आग, ५ ठार

एकमत ऑनलाईन

हैदराबाद : आंध्र प्रदेशातील सत्यसाई जिल्ह्यात गुरुवारी एक भीषण अपघात झाला. येथे हायटेंशन वायर पडल्याने एका ऑटोला आग लागली. शेतात कामाला जाणारे कामगार ऑटोत बसले होते.

यामध्ये ५ जणांचा भाजून मृत्यू झाला तर ३ जण जखमी झाले. ड्रायव्हर आणि इतर ५ प्रवाशांनी ऑटोतून उडी मारून आपला जीव वाचवला. जवळच्या गावातील एका शेतक-याने मजुरांना बोलावले होते. हे सर्वजण सात सीटर ऑटोमधून जात होते. त्यावेळी ही दुर्घटना घडली.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या