27.4 C
Latur
Tuesday, November 29, 2022
Homeराष्ट्रीयउत्तराखंडमध्ये हिमस्खलन, १० जणांचा मृत्यू

उत्तराखंडमध्ये हिमस्खलन, १० जणांचा मृत्यू

एकमत ऑनलाईन

डेहराडून : उत्तराखंडमध्ये हिमस्खलन झाल्याची घटना घडली असून यामध्ये २० जण अडकल्याची भीती व्यक्त होत आहे. तर १० जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. द्रोपदी डंडा २ पर्वत शिखरावर ही दुर्घटना घडली असून अडकलेल्या गिर्यारोहकांना बाहेर काढण्यासाठी बचाव मोहीम राबवली जात आहे.

या दुर्घटनेबाबत उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी ट्विट करुन माहिती दिली. तसेच बचाव मोहिमेबाबत माहिती देताना म्हटले की हिमस्खलनात अडकलेल्या गिर्यारोहकांना वाचवण्यासाठी जिल्हा प्रशासन, एनडीआरएफ, एसडीआरएफ आणि आयटीबीपीच्या जवानांकडून वेगाने दिलासा आणि बचावकार्य सुरु करण्यात आले आहे.

तसेच भारतीय हवाई दलाने दिलासा आणि बाचाव कार्यासाठी दोन चिता हेलिकॉप्टर पाठविण्यात आले आहेत. प्राथमिक माहितीनुसार, आज सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास ही हिमस्खलनाची घटना घडली आहे. या घटनेची माहिती मिळताच द्रोपदी डंडा २ शिखरावर अडकलेल्या लोकांच्या बचावासाठी एसडीआरएफच्या टीमला रवाना करण्यात आले आहे.

२८ पैकी ८ जणांची सुटका
उत्तराखंडचे डीजीपी अशोक कुमार यांनी सांगितले की, द्रोपदी डांडा २ या पर्वत शिखरावर हिमस्खलन झाले असून यामध्ये नेहरू माऊंटनेरिंग संस्थेचे २८ प्रशिक्षणार्थी अडकले होते. यांपैकी ८ जणांना सुरक्षितरित्या वाचवण्यात आले आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या