23.6 C
Latur
Tuesday, July 5, 2022
Homeराष्ट्रीयहवाई इंधन महागले; विमानभाडे वाढणार

हवाई इंधन महागले; विमानभाडे वाढणार

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : विमानाने प्रवास करणा-या प्रवाशांना या बातमीमुळे मोठा धक्का बसू शकतो. दिल्लीतील एव्हिएशन टर्बाइन इंधनाच्या किमती तब्बल १६.३ टक्क्यांनी वाढल्या आहेत. हवाई इंधनाच्या किमतीने विक्रमी पातळी गाठली आहे. २०२२ मध्ये हवाई इंधनाच्या किमती जवळपास दुप्पट झाल्या आहेत. दिल्लीत एटीएफचा दर १.४१ लाख रुपये प्रति किलोलिटरवर पोहोचला आहे, जो आतापर्यंतचा विक्रम आहे. १६ जून रोजी त्यात १६.३ टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे. गेल्या सहा महिन्यांत हवाई इंधनाच्या किमती ९१ टक्क्यांनी वाढल्या आहेत.

परिणामी विमान प्रवासभाड्यात १५ टक्के वाढ करण्याची मागणी विमान वाहतून कंपन्यांनी केली आहे.
२०२२ मध्येच हवाई इंधनाच्या किमती सलग १० वेळा वाढवण्यात आल्या आहेत. यानंतर १ जून रोजी त्याच्या किमतीत १.३ टक्क्यांनी किरकोळ कपात करण्यात आली. त्यानंतर जागतिक बाजारातही कच्च्या तेलाच्या किमतीत घसरण झाली. मात्र, आता त्यात पुन्हा एकदा जोरदार वाढ झाली आहे. आता येत्या काही दिवसांत विमान प्रवासाचे भाडेही वाढू शकते.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या