26.9 C
Latur
Thursday, September 29, 2022
Homeराष्ट्रीयआझाद स्वतंत्र पक्ष स्थापन करणार

आझाद स्वतंत्र पक्ष स्थापन करणार

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : काँग्रेसला नुकताच रामराम ठोकलेले गुलाम नबी आझाद स्वत:चा पक्ष सुरू करण्याच्या तयारीत आहेत. त्याचे पहिले युनिट १४ दिवसांत जम्मू-काश्मीरमध्ये सुरू होईल. त्यांचे निकटवर्तीय जीएम सरोरी यांनी याबाबत माहिती दिली. गुलाम नबी आझाद यांनी शुक्रवारी पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांना पत्र लिहून काँग्रेसचा राजीनामा दिला होता. राजीनामा देताना त्यांनी काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्यावरही टीका केली होती.

माजी मंत्री जीएम सरोरी हेदेखील जम्मू आणि काश्मीर काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांपैकी एक आहेत. ज्यांनी आदल्या दिवशी गुलाम नबी आझाद यांच्या समर्थनार्थ काँग्रेसचा राजीनामा दिला. त्यांचे नेते वैचारिकदृष्ट्या धर्मनिरपेक्ष राहिले असून भाजपच्या इशा-यावर काम करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असे ते म्हणाले. माजी मुख्यमंत्री आझाद यांनी काँग्रेस सोडल्यानंतर शेकडो ज्येष्ठ काँग्रेस नेते, पंचायतीराज संस्थांचे सदस्य आणि प्रमुख कार्यकर्त्यांनी राजीनामा दिल्याचा दावाही त्यांनी केला.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या