24.9 C
Latur
Friday, January 28, 2022
Homeराष्ट्रीयबाबुल सुप्रियोंचा खासदारकीचा राजीनामा

बाबुल सुप्रियोंचा खासदारकीचा राजीनामा

एकमत ऑनलाईन

कोलकाता : माजी केंद्रीय मंत्री बाबुल सुप्रियो यांनी भाजपाच्या खासदारकीचा राजीनामा दिला असून, बाबुल सुप्रियो लोकसभेचे खासदार होते. यावेळी त्यांनी भाजपा सोडताना आपल्याला खूप वाईट वाटल्याचे म्हटले आहे. बाबुल सुप्रिया यांनी लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेण्याआधी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राजकारणात संधी दिल्याबद्दल तसेच, पक्षात महत्त्वाच्या भूमिका दिल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि वरिष्ठ नेत्यांचे आभार मानले.

भाजपासोबत राजकीय करिअरला सुरुवात केल्याने मी भावूक झालो आहे. मी पंतप्रधान, भाजपाध्यक्ष आणि अमित शाह यांचे आभार मानतो. त्यांनी माझ्यावर विश्वास दाखवला, असे बाबुल सुप्रियो म्हणाले आहेत. बाबुल सुप्रियो यांनी गेल्या महिन्यात भाजपाला सोडचिठ्ठी देत तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला. आपण राजकारणातून संन्यास घेत असल्याने खासदारकीचा राजीनामा देणार असल्याचे त्यांनी जाहीर केले होते. मी पूर्णपणे राजकारण सोडत आहे. जर मी पक्षाचा भाग नसेन तर ही जागा ठेवणे योग्य नाही असा विचार मी केला, असे बाबुल सुप्रियोंनी सांगितले.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,567FansLike
192FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या