25.4 C
Latur
Wednesday, May 19, 2021
Homeराष्ट्रीयलालू प्रसाद यादव यांना जामीन मंजूर

लालू प्रसाद यादव यांना जामीन मंजूर

एकमत ऑनलाईन

रांची : चारा घोटाळा प्रकरणी एका वर्षाहून अधिक काळ तुरुंगात काढलेले राष्ट्रीय जनता दलाचे(आरजेडी)प्रमुख लालू प्रसाद यादव यांचा जामीन आज झारखंड उच्च न्यायालयाने मंजूर केला आहे. या निर्णयानंतर आता लालू यादव यांची तुरुंगातून सुटका होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. दुमका कोषागारमधून अवैधरित्या ३.१३ कोटी काढल्याप्रकरणी त्यांना जामीन मिळाला आहे. या घोटाळ्यातल्या ४ प्रकरणांसंदर्भात त्यांना शिक्षा सुनावण्यात आली आहे. यातील ३ प्रकरणांमध्ये त्यांना यापूर्वीच जामीन मिळालेला आहे.

लालू यांचे वकील देवर्षि मंडल यांच्या म्हणण्यानुसार कोरोनाची स्थिती लक्षात घेता याप्रकरणी ऑनलाईन सुनावणी घेण्यात आली. झारखंड उच्च न्यायालयाचे न्यायाधीश अपरेश सिंह यांच्या खंडपीठाने दुमका कोषागार प्रकरणी सुनावणीनंतर आरजेडी नेते लालू प्रसाद यांना जामीन देण्याचा निर्णय घेतला. दुमका कोषागारमधून अवैधरित्या रक्कम काढल्याप्रकरणी याआधीदेखील अनेकदा सुनावणी झाली होती. मात्र, लालू यादव यांनी दिलासा मिळाला नव्हता.

महाराष्ट्राचा औषध पुरवठा रोखला? नवाब मलिक यांचा आरोप; भाजपचे प्रत्युत्तर

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,498FansLike
190FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या