नवी दिल्ली : वाराणसीतील ज्ञानवापी मशिदीत सापडलेल्या शिवल्ािंगाबाबत वादग्रस्त ट्विट केल्याने अटकेत असलेले दिल्ली विद्यापीठातील प्राध्यापक रतनलाल यांना शनिवारी सायंकाळी जामीन मंजूर करण्यात आला. त्यांनी सोशल मीडियावर वादग्रस्त ट्विट केले होते आणि त्यावरून खूप टीका झाली.
त्यांच्याविरोधात धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप केला होता. त्यांच्याविरुद्ध विनीत जिंदाल या वकिलाने तक्रार केली होती. यादरम्यान हिंदू महाविद्यालयात अध्यापन करणारे प्रा. रतनलाल यांच्या अटकेच्या निषेधार्थ विद्यार्थी संघटना पुढे आल्या. उत्तर दिल्ली पोलिस ठाण्याबाहेर विद्यार्थी व महाविद्यालयीन शिक्षकांनीही निदर्शने केली. यावेळी त्यांनी रतनलाल यांना जामीन न मिळाल्यास शिक्षण मंत्रालयासमोर (शास्त्री भवन) तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला होता.