28.3 C
Latur
Friday, June 25, 2021
Homeराष्ट्रीयनारदा प्रकरणी तृणमुलच्या ४ नेत्यांचा जामीन रद्द

नारदा प्रकरणी तृणमुलच्या ४ नेत्यांचा जामीन रद्द

एकमत ऑनलाईन

कोलकाता : पश्चिम बंगालमधील नारदा स्टिंग ऑपरेशन प्रकरणी सलग दुस-या दिवशीही पश्चिम बंगालमधील वातावरण तापले आहे. ममता बॅनर्जींच्या मंत्रीमंडळातील लाचखोर मंत्र्यांसह ४ नेत्यांना मिळालेला जामीन कोलकाता उच्च न्यायालयाने रद्द केला. त्यानंतर चारही लाचखोर नेत्यांना अर्ध्या रात्रीतच कारागृहात पाठविण्यात आले आहे. ममता बॅनर्जी यांना हा फार मोठा दणका असून तृणमुल काँग्रेसकडून मोदी सरकार विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर सूड म्हणून असले प्रकार करीत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

तृणमुल काँग्रेसच्या सर्व भ्रष्टाचारी नेत्यांना सीबीआयने सोमवारी छापेमारीनंतर चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. सीबीआयच्या विशेष न्यायालयाने या प्रकरणात टीएमसी नेते फिरहाद हकीम, सुब्रत मुखर्जी, आमदार मदन मित्रा, माजी टीएमसी नेते आणि कोलकात्याचे माजी महापौर सोवन चटर्जी यांना जामीन दिला होता. मात्र, कोलकता उच्च न्यायालयाने खालच्या न्यायालयाने दिलेल्या आदेशाला स्थगिती दिली आहे.

चार वर्षांनंतर प्रकरणाची चौकशी
सोमवारी पक्षाच्या नेत्यांना सीबीआयने चौकशीसाठी ताब्यात घेतल्यानंतर ममता बॅनर्जींनी सीबीआय कार्यालयात सहा तास धरणे दिले होते. तृणमुलच्या कार्यकर्त्यांनी परिसराला घेराव घातला होता. तसेच सीबीआयच्या या कारवाईविरोधात राज्यात अनेक ठिकाणी हिंसक निदर्शनेही झाली. नारदा स्टिंग ऑपरेशन प्रकरणी कोलकाता उच्च न्यायालयने २०१७ सालीच चौकशीचे आदेश सीबीआयला दिले होते. मात्र त्यानंतर तब्बल ४ वर्षे हे प्र्रकरण ठंड्या बस्त्यात राहिले होते. मात्र २०२१ च्या विधानसभा निवडणुकीतील भाजपच्या पराभवानंतर पुन्हा हे प्रकरण सुरु करण्यात आले आहे.

इस्त्रायलचा विरोधकांना इशारा

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
202FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या