37.6 C
Latur
Monday, April 19, 2021
Homeराष्ट्रीयआंतरराष्ट्रीय उड्डाणांवरील बंदीत ३१ मार्चपर्यंत वाढ

आंतरराष्ट्रीय उड्डाणांवरील बंदीत ३१ मार्चपर्यंत वाढ

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : कोरोना माहामारीच्या पार्श्वभूमीवर भारतातून परदेशात जाणा-या आणि परदेशातून भारतात येणा-या व्यावसायिक विमान उड्डाणांवरील बंदीत ३१ मार्चपर्यंत वाढ करण्यात आली आहे. नागरी उड्डाण संचालनालयाने (डीजीसीए) याबाबत एका निवेदनाद्वारे याची घोषणा केली. डीजीसीएने आपल्या निवेदनात म्हटले की, येत्या २८ फेब्रुवारी रोजी आंतरराष्ट्रीय विमानोड्डाणांवरील बंदीची मुदत संपणार होती. मात्र, आता ही बंदी ३१ मार्चपर्यंत कायम राहणार आहे. तसेच मालवाहतूक उड्डाणे आणि एअर बबल पॅक्ट (तात्पुरत्या सरकारी विमान कंपन्यांना परवानगी) अंतर्गत काही निवडक देशांसाठीची विशेष परवानगी मात्र कायम आहे, असे डीजीसीएच्या दक्षता प्राधिकरणाने सांगितले आहे.

एअर बबल पॅक्ट म्हणजे काय?
दोन देशांमधील एअर बबल पॅक्ट म्हणजे अशी व्यवस्था ज्याद्वारे भारत आणि इतर देशांमध्ये करोनाच्या काळात काही नियम व अटींच्याअधिन राहून संबधित देशांच्या राष्ट्रीय विमान कंपन्यांना उड्डाणांची परवानगी देण्यात आलेली असते.

कोणत्या देशांसोबत एअर बबल पॅक्ट लागू?
भारतानं सध्या २७ देशांसोबत अशा प्रकारे एअर बबल पॅक्टवर सह्या केल्या आहेत. यामध्ये अफगाणिस्तान, बहरिन, बांगलादेश, भूतान, कॅनडा, इथिओपिया, फ्रान्स, जर्मनी, इराक, जपान, केनिया, कुवैत, मालदीव, नेपाळ, नेदरलँड, नायजेरिया, ओमान, कतार, रवांडा, सिचेलस, टांझानिया, युक्रेन, युएई, युके, उझबेकिस्तान आणि अमेरिका या देशांचा समावेश आहे.

५ राज्यातील निवडणुकीचा वाजला बिगुल

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,477FansLike
169FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या